इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सनराइजर्स हैद्राबाद संघामध्ये डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे यांच्यासारखे अनेक महागडे आणि अनुभवी खेळाडू आहेत. परंतु, या मोठ-मोठ्या दिग्गजांवर १८ वर्षीय देशांतर्गत अष्टपैलू खेळाडू अब्दुल समद भारी पडू शकतो. या खेळाडूला हैद्राबाद संघाने आयपीएल २०२०च्या लिलावात अगदी तुटपूंज्या २० लाख रक्कमेला विकत घेतले होते. Information About Sunrisers Hydrabad 18 Years Player Abdul Samad
जम्मू-काश्मिरच्या अब्दुलचा जन्म २८ ऑक्टोबर २००१ ला झाला होता. त्याने गतवर्षी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आतापर्यंत अब्दुलने केवळ १० प्रथम श्रेणी सामने खेळत ५९२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, अ दर्जाच्या ८ सामन्यात त्याने २३७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, देशांतर्गत स्तरावरील टी२० सामन्यात २४० धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद ७६ धावांचा समावेश आहे.
आयपीएलच्या २०२०च्या लिलावात सर्वप्रथम सनराइजर्स हैद्राबादने अब्दुलला ट्रायल्समध्ये शॉर्टलिस्ट केले होते. त्यानंतर स्वत: संघाचे फलंदाजी प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी त्याची निवड केली होती. यासह तो आयपीएलचा करार मिळवणारा परवेज रसूल, मंजूर डार आणि रखिल सलाम यांच्यानंतर जम्मू-काश्मिरचा चौथा खेळाडू ठरला आहे.
अब्दुल हा देशांतर्गत स्तरावरील सर्वोत्कृष्ट फिनिशर्सपैकी एक आहे. त्याला फिरकीपटूंविरुद्ध दमदार फलंदाजी करण्यासाठी ओळखले जाते. अब्दुलला गतवर्षीच्या रणजी ट्रॉफी क्रिकेटमधील त्याच्या प्रदर्शनामुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. त्याने डिसेंबर २०१९ला आसामविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात केवळ ७२ चेंडूत १०३ धावांची अफलातून शतकी खेळी केली होती. यात त्याच्या ८ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता.
जर हैद्राबाद संघाच्या फलंदाजी फळीत पहिल्या ४ स्थानांमध्ये मनिष पांडेला ठेवले गेले, तर अब्दुलला ६व्या किंवा ७व्या स्थानावर फलंदाजीला पाठवण्यात येऊ शकते. यासाठी त्याची स्पर्धा विराट सिंग, मोहम्मद नबी आणि फॅबियन ऍलन या खेळाडूंशी होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पॉंटिंगने घेतली ‘या’ दोन फलंदाजांची नावे
नुकतेच आयपीएलमधून माघार घेतलेल्या या क्रिकेटपटूची झाली फसवणूक
हिटमॅनला गोलंदाजीचे धडे देताना पाहिलंय का? पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज
आयपीएलच्या सर्व ८ संघांच्या सपोर्टिंग स्टाफची संपूर्ण माहिती, घ्या जाणून