---Advertisement---

‘ही’ आहे रोहित शर्माची नवी सोशल मीडिया मॅनेजर; मुंबई इंडिसन्सने शेअर केला फोटो

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2020 2:32 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतात परतला आहे. काही दिवसांपुर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात (IndVsNZ) 5 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेच्या अखेरच्या सामन्या दरम्यान रोहितला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे आणि कसोटी मालिकेतूही बाहेर पडला आहे. भारतात परतल्यानंतर रोहित त्याच्या परिवारासोबत वेळ घालवत आहे.

या दौऱ्यानंतर मार्चमध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका (ODI) खेळायची. यानंतर 29 मार्चपासून आयपीएलचा 13वा हंगाम सुरू होईल. यापुर्वी मुंबई इंडिसन्स संघाने रोहितच्या सोशल मीडिया मॅनेजरची चाहत्यांशी ओळख करून दिली आहे.

आयपीएल सुरु होण्यापूर्वी आयपीएल फ्रेंचाइजी सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर वापरकर्त्यांना अधिक वेळ गुंतवूण ठेवण्यासाठी अनेक संघ गमतीशीर ट्वीट्स करताना दिसून येत आहेत. यात भर घालत मुंबई इंडियन्सने रोहीत आणि त्याची मुलगी समायराचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये दिसते की रोहित समायराला मोबाईलवरील कोणतीतरी गोष्ट दाखवत आहे. समायराही गंभीरतेने त्याकडे पाहत आहे.

या फोटोला शेअर करत, “रोहित शर्माची नवीन सोशल मीडिया मॅनेजर किती ‘क्यूट’ आहे? या फोटोला 1-10 पर्यंत गुण द्या.” असे कॅप्शन मुंबई इंडियन्सने दिले आहे.  या पोस्टला मजेशीर प्रत्युतरही देत आहेत.

आयपीएल 2020ची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याने होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात येणार आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1230051650221547520

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---