मुंबई । क्रिकेट संघ हा खेळ आहे आणि संघ सहकार्याचा सल्ला येथे महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात खेळल्या जाणार्या सामन्यात त्याचे उदाहरण पाहायला मिळाले. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात 163 धावांचा पाठलाग सुरु केला. चेन्नईला मुरली विजयच्या रुपाने दुसरा धक्का बसला. तो केवळ वैयक्तिक १ धावेवर पायचीत झाला.
खरंतर दुसर्या षटकात तो बाद झाला तेव्हा तो नाबाद राहू शकला असता. कारण जेम्स पॅटिन्सनने विजयला टाकलेला चेंडू प्रत्यक्षात चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता. पण त्या चेंडूवर मैदानावरील पंचांनी विजयला बाद घोषित केले, तेव्हा नॉन-स्ट्राइकर एंडवर असणारा विजयचा संघ सहकारी फाफ डु प्लेसिसने त्याला डीआरएस घेण्याचा सल्ला दिला. पण विजयला वाटले की तो बाद आहे. तसेच रिव्ह्यू खराब होऊ शकतो, या विचाराने त्याने रिव्ह्यू घेतला नाही.
टीव्हीवरून रिप्लेमध्ये हे स्पष्ट झाले की, त्याने फाफचा सल्ला ऐकला असता, तर तो आपला डाव पुढे चालू ठेवू शकला असता आणि चेन्नईही अडचणीत आली नसती. त्याच्याआधी सलामीवीर शेन वॉटसन (एलबीडब्ल्यू) अवघ्या 4 धावांवर बाद झाला होता. मुरली बाद झाल्यानंतर सीएसकेची अवस्था 2 बाद 2 अशी झाली. पण त्यानंतर अंबाती रायुडू आणि फाफ डु प्लेसिस यांनी अर्धशतकी खेळी साकारली आणि सीएसकेला विजय मिळवून दिला.
What's wrong with Murali Vijay? Even though Faf insisted he didn't go for a review! pic.twitter.com/jD6UVptMgV
— Kavin (@kavin_uk) September 19, 2020
आयपीएल13 च्या पहिल्या सामन्यात गत विजेता मुंबई इंडियन्सची दमदार फलंदाज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. मुंबईने बर्याच प्रयत्नांनंतर 20 षटकांत नऊ गडी गमावून 162 धावांची सन्माननीय धावसंख्या उभारली आहे. चांगली सुरुवात झाल्यानंतर मुंबईकडून मोठी धावसंख्या उभारणे अपेक्षित होते, पण शेवटी पोलार्ड आणि हार्दिक पंड्या फ्लॉप झाले. चेन्नई सुपर किंग्जने 19.2 षटकांत 5 गडी गमावून 166 धावा करुन सामना जिंकला.