आयपीएल २०२० मधील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला. धावांचा डोंगर उभारताना सुर्यकुमार यादव व इशान किशनने शानदार अर्धशतकी खेळी केली. परंतु कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरला. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहर रोहितसाठी पुन्हा एकदा अनलकी ठरले.
यावर्षी रोहितने आयपीएलमध्ये ११ डावांत फलंदाजी केली. यात ६ डाव तो अबु धाबी, ३ डाव दुबई व २ डाव शारजाह येथे खेळला. यातील आबू धाबी येथे रोहितने ६ डावांत ४०च्या सरासरीने व १३२ स्ट्राईक रेटने धावा केल्या. तर दुबई येथे त्याने ३ डावांत केवळ ६च्या सरासरीने व १००च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. अशीच गत शारजाहवरही झाली. शारजहात रोहितने २ डावांत ५च्या सरासरीने व केवळ ८३च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.
आयपीएलमध्ये तब्बल पाचव्यांदा गोल्डन डक अर्थात पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा नकोसा विक्रमही रोहितने केला आहे. तो आयपीएलमध्ये एकूण १३ वेळा शुन्यावर बाद झाला. शुन्यावर बाद होण्याचा हरभजन सिंग व पार्थिव पटेलच्या सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या विक्रमाची बरोबरी त्याने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार का सलामीची जागा ?
-“रोहितची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी घेण्यात गैर नाही”, माजी दिग्गजाचे रोखठोक मत
-संघात स्थान देण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे मागितली लाच, खुद्द विराटनेच केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
-‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!