Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

November 5, 2022
in टॉप बातम्या, क्रिकेट
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 34 वा वाढदिवस. क्रिकेटमधील सध्याचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराटने नाव मिळवले आहे. विराटच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 24,000 हजारांपेक्षाही अधिक धावा आहेत. 

अशा या दिग्गज फलंदाजाबद्दल या काही खास गोष्टी-

-विराट कोहली (Virat Kohli) याचे टोपननाव चिकू आहे. त्याने जेव्हा दिल्ली रणजी टीममध्ये प्रवेश केला तेव्हा संघ प्रशिक्षक अजित चौधरी यांनी त्याला हे नाव दिले.

-2006मध्ये दिल्ली विरुद्ध कर्नाटक रणजी सामन्यावेळी विराटच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर पुढच्या दिवशी विराटने फलंदाजीला येत 90 धावांची खेळी केली होती.

-2008मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता.

-विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले तर 2011 मध्ये विराट विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता.

-विराटने 2011 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. विश्वचषकातील पदार्पण सामन्यात शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

-वयाच्या 23 व्या वर्षी 2012 मध्ये विराटला आयसीसीचा ‘वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर’ म्हणून गौरविण्यात आले.

-कोहलीच्या अंगावर अनेक टॅट्यू असून त्याच्या हातावर सोन्याचा ड्रॅगन आणि समुराई योद्धा यांचे टॅट्यू देखील आहेत.

-त्याला मटण बिर्याणी आणि खीर आवडते आहे. विशेषत: जेव्हा ते त्याच्या आईने बनवलेली असेल.

-2013 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्याला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच 2017 मध्ये प्रणव मुखर्जींच्याच हस्ते त्याला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

-भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारही 2018 मध्ये विराटला देण्यात आला

-2013 मध्ये जयपूर येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामन्यात त्याने सर्वात वेगवान शतक झळकावले होते. त्याने 52 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 100 धावांची खेळी केली होती.

-254 आंतराष्ट्रीय वनडे सामन्यात त्याने 12344 धावा केल्या आहेत. तसेच 43 शतके ठोकली आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 आहे.

-कसोटी क्रिकेटमध्ये विराटने 102 सामन्यांत 8074 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 27 शतके केली आहेत.

-2012 मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचादेखील समावेश असलेल्या दहा बेस्ट ड्रेसड आंतरराष्ट्रीय पुरुषांपैकी एक म्हणून विराटची निवड झाली होती.

– विराटने एकदा खुलासा केला होता की त्यांचा पहिला क्रश करिश्मा कपूर होती.

– विराटने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर विवाह केला. त्यांना वामिका नावाची मुलगीही आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
हॅप्पी बर्थडे विराट …!!!
बड्डे बाॅय विराट महिन्याला पितो ३६ हजार रुपयांचं पाणी…
विराट कोहलीचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास…!!


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत 'हे' खास पराक्रम!

Virat-Kohli

एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती पहिली टी20 विकेट

Photo Courtesy: Twitter/ BCCI

हॅप्पी बर्थडे विराट …!!!

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143