आयपीएलचा १३ वा हंगाम आता बऱ्यापैकी पुढे सरकला आहे. आज, शुक्रवार दि १० ऑक्टोबर पर्यंत आयपीएल २०२० चे एकूण २३ सामने खेळले गेले आहेत. आता आयपीएलमध्ये अर्ध्या हंगामानंतर असा बदल होणार आहे, जेव्हा एक खेळाडू एका संघातून दुसर्या संघात जाऊ शकतात.
बीसीसीआयने असे नियम बनवले आहेत की आयपीएलच्या अर्ध्या हंगामानंतर संघ खेळाडूंची देवाणघेवाण करू शकता. संघ संयोजन लक्षात घेऊन आयपीएल फ्रँचायझी इतर संघातील खेळाडूंना आपल्या संघात जोडू शकतात आणि आपल्या संघातील खेळाडू इतर संघात देऊ शकतात. त्याला मिड सीझन ट्रान्सफर असे म्हणतात. पण यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. काय आहेत ते नियम हे आपण पाहू.
मिड सीझन ट्रान्सफरसाठीचे नियम काय ?
१. भारतीय आणि परदेशी असे दोन्ही खेळाडू मिड सीजन ट्रांसफरसाठी उपलब्ध असतील. मग ते कॅप्ड प्लेयर असो वा अनकॅप्ड प्लेयर (आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला किंवा न खेळलेले).
२. मिड सीजन ट्रांसफरची एकमात्र अट अशी आहे की ज्या खेळाडूचे ट्रांसफर करायचे आहे, त्याने हंगामात २ पेक्षा कमी सामने खेळले असले पाहिजे. त्याच खेळाडूची अदला – बदली करता येईल.
३. आयपीएलमधील सर्व आठ संघांनी त्यांचे किमान प्रत्येकी ७ सामने खेळले पाहिजे, तरच संघातील खेळाडू मिड सीजन ट्रांसफरसाठी पात्र ठरतील.
४. खेळाडू बदली करताना त्या खेळाडूला देण्यात येणारी रक्कम फ्रँचायझीच्या पर्स मधून वजा होणार नाही.
५. याच्याशी संबंधित दोन फ्रॅन्चायझी आणि खेळाडूंना पुढे जाण्यासाठी दोघांची सहमती असणे आवश्यक आहे.
६. एखाद्या खेळाडूची बदली झाल्यास, त्या खेळाडूला लिलावात जी रक्कम मिळाली, तेवढीच रक्कम मिळेल.
मिड सीजन ट्रांसफरसाठी पात्र खेळाडू –
मुंबई इंडियन्स – आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, शेरफान रदरफोर्ड, मिशेल मॅकक्लेनाघन, ख्रिस लिन, मोहसिन खान, दिग्विजय देशमुख, प्रीस बलवंत राय आणि सौरभ तिवारी.
दिल्ली कॅपिटल्स – अजिंक्य रहाणे, अवेश खान, हर्षल पटेल, इशांत शर्मा, केमो पॉल, संदीप लमिछाने, अॅलेक्स कॅरी, ललित यादव, डॅनियल सायम्स, तुषार देशपांडे, अवेश खान, इशांत शर्मा आणि मोहित शर्मा.
किंग्ज इलेव्हन पंजाब – अर्शदीप सिंग, दर्शन नालकांडे, हार्दस विल्जॉन, ख्रिस गेल, हरप्रीत ब्रार, जे सुचित, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, दीपक हूडा, ईशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, सिमरन सिंग, तजिंदर सिंग आणि ख्रिस जॉर्डन.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, मोनू कुमार, आर साई किशोर, केएम आसिफ, कर्ण शर्मा, नारायणन जगदीशन, इमरान ताहिर, मिशेल सॅटनर आणि जोश हेजलवुड.
कोलकाता नाइट रायडर्स – प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, सिद्धेश लाड, एम सिद्धार्थ, टॉम बंटन, लॉकी फर्ग्युसन आणि निखिल नाईक.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – पार्थिव पेटल, पवन नेगी, उमेश यादव, डेल स्टेन, शाहबाज अहमद आणि पवन देशपांडे.
सनरायझर्स हैदराबाद – बासिल थंपी, बिली स्टॅनलेक, मोहम्मद नबी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, वृध्दिमान साहा, विजय शंकर, विराट सिंग, बावनका संदीप, फॅबियन ऐलन आणि संजय यादव.
राजस्थान रॉयल्स – मयंक मार्कंडे, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण आरोन, ओशन थॉमस, अनिरुद्ध जोशी, अँड्र्यू टाय, आकाश सिंग आणि अनुज रावत.






