भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला मैदानावर नेहमीच आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जाते. परंतु मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुबई येथे आयपीएल २०२० च्या २९ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमने- सामने आले होते. या सामन्यात धोनीचे संतुलन बिघडलेले दिसले. चेन्नई संघाकडून १८ व्या षटकात फिरकीपटू कर्ण शर्माने खूप धावा दिल्या. रागात असलेला धोनी षटक संपल्यानंतर कर्ण शर्माला समजावताना दिसला.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ६ विकेट्स गमावत १६७ धावा केल्या होत्या. चेन्नईच्या या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास उतरलेल्या हैदराबाद संघाचा डाव १७ व्या षटकानंतर ५ विकेट्स गमावत १२२ धावा असा होता. त्यावेळी कर्ण आपले शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. हैदराबाद संघाला विजयासाठी १८ चेंडूत ४६ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी केन विलियम्सन फलंदाजी करता होता. कर्णला आपल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विलियम्सनने चौकार ठोकला.
https://twitter.com/aditya_bh16/status/1316256658184572928
त्यानंतर कर्णने विलियम्सनला शार्दुल ठाकूरच्या हातून झेलबाद करत पुनरागमन केले. परंतु यानंतर कर्णच्या गोलंदाजीमुळे धोनी भलताच नाराज झालेला दिसला. पुढील चार चेंडूंवर कर्णने २ चौकार आणि १ षटकार दिला. यानंतर मात्र धोनी स्वत:ला शांत ठेवू शकला नाही. शर्माने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर फलंदाजीस आलेल्या राशिद खानने षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्याही चेंडूवर राशिदने रिव्हर्स स्वीप खेळत चौकार टोकला. यानंतर धोनी कर्ण शर्माशी चर्चा करताना दिसला. परंतु यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव घेत राशिदने स्ट्राईक शाहबाज नदीमकडे सोपविली. तो आपला पहिलाच चेंडू खेळत होता. त्याने षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार झळकावला. यानंतर धोनी कर्णवर ओरडताना दिसला.
कर्णने आपल्या या षटकात तब्बल १९ धावा दिल्या होत्या. यानंतर धोनीने कर्णला बोलावले आणि त्याला काहीतरी म्हणाला. धोनी अनेकवेळा मैदानात असे हावभाव करताना दिसला, यावरून स्पष्ट होत होते की, तो कर्णच्या गोलंदाजीवर खुश नाही. कर्णने सामन्यात २ विकेट्स घेत सर्वाधिक ३७ धावा दिल्या होत्या. यानंतर शार्दुलने १९ वे षटक टाकले. त्यात त्याने केवळ ५ धावा दिल्या. सोबतच एक विकेटही चेन्नई संघाला मिळाली. त्यानंतर शेवटचे षटक ड्वेन ब्राव्होने टाकले. त्यात त्याने केवळ १ धाव देऊन चेन्नईला २० धावांनी विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
-“धोनी अंपायरचाही कर्णधार”, वाईडचा निर्णय रोखल्याने चाहत्यांनी साधला निशाणा
-वाह क्या बात है! धोनीचा अवघड झेल घेण्यात अपयशी ठरल्यानंतरही होतेयं संदीपचं कौतुक, पाहा व्हिडिओ
-चेन्नई एक्सप्रेस पुन्हा रुळावर, हैदराबाद विरुद्धच्या विजयासह गुणतालिकेत आली ‘या’ स्थानावर
ट्रेंडिंग लेख-
-गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार
-दिल्लीला आयपीएल चषक जिंकायचा असेल, तर ‘या’ ३ गोष्टींकडे द्यावे लागले लक्ष