आयपीएलच्या 13 व्या हंगामातील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7.30 वाजता दुबईमध्ये खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळवेल आणि पराभूत झालेल्या संघाला अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळेल.
पराभूत संघाचा सामना एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी होईल
क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाचा सामना 6 नोव्हेंबरला होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघाशी होईल. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामना खेळेल. अबुधाबी येथे शुक्रवारी (6 नोव्हेंबर) एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होईल.
गुणतालिकेत मुबंई आणि दिल्ली अव्वल दोनमध्ये
साखळी फेरीत मुंबई व दिल्ली उत्कृष्ट कामगिरी करत गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर आहेत. मुंबईने 14 पैकी 9 सामने जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. या संघाने 18 गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. दुसरीकडे दिल्लीने 14 पैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. हा संघ 16 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे.
हंगामात दिल्लीचा दोन्ही वेळा मुंबईकडून पराभव
हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले. मुंबईने दोन्ही वेळा दिल्लीचा पराभव केला. अबू धाबी येथे झालेल्या सामन्यात 5 विकेट्सने आणि दुबईतील सामन्यात 9 विकेट्सने मुंबईकडून दिल्लीचा पराभव झाला होता.
मुबंईत सामना जिंकवून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा
मुंबई इंडियन्स हा या स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ आहे. फलंदाजीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यासारखे एकहाती सामना जिंकवून देणारे खेळाडू आहेत. कायरान पोलार्ड आणि क्रुणाल पंड्यासारख्या अष्टपैलू खेळाडूंनी संघाला बळकटी आली आहे.
दिल्लीचा फॉर्म चिंतेचा विषय
फलंदाजी करताना दिल्ली संघ सलामीवीर शिखर धवनवर अधिक अवलंबून असल्याचे दिसत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतसारखे फलंदाज खास फॉर्ममध्ये नाहीत. गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडा आणि एन्रीच नॉर्किए यांना सहकारी गोलंदाजांकडून अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळत नाही.
डिकॉक आणि किशन यांनी मुंबईकडून केल्या सर्वाधिक धावा
मुंबईचा सलामीवीर क्विंटन डिकॉकने मुंबईकडून या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने आतापर्यंत एकूण 443 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर दुसर्या क्रमांकावर युवा फलंदाज ईशान किशन आहे. त्याने हंगामात आतापर्यंत 428 धावा केल्या आहेत.
शिखर धवनने केल्या 500 हून अधिक धावा
हंगामात आतापर्यंत केवळ 3 फलंदाजांनी 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल (670), सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर (529) आणि त्यानंतर धवनच्या 525 धावा असून त्यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे.
रबाडाकडे पर्पल कॅप, बुमराह दुसर्या स्थानावर
दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने या हंगामात आतापर्यंत 25 बळी घेतले आहेत. तो हंगामात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्यापाठोपाठ मुंबईचा जसप्रीत बुमराह आहे. त्याने या हंगामात 23 बळी घेतले आहेत.
खेळपट्टीबद्दल माहिती आणि हवामान अहवाल
दुबईत आकाश स्वच्छ राहील. तापमान 22 ते 33 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. या आयपीएलपूर्वी झालेल्या 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 55.74% आहे
या मैदानावर झालेले एकूण टी20 सामने: 61
प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने मिळवलेले विजय : 34
प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने मिळवलेले विजय: 26
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 144
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 122
महत्त्वाच्या बातम्या –
शिखर धवन म्हणतो, ‘तो’ संघात असला की मला मुक्तपणे खेळायची संधी मिळते
टेबलवर पाय ठेवून मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या क्रिकेटरची निवृत्ती
माझे बाबा सगळ्यात भारी! रहाणेची इवलुशी मुलगी बनलीय चीयरलीडर; भन्नाट व्हिडिओ व्हायरल
ट्रेंडिंग लेख –
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!