आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते.
आयपीएल २०२० मधील २८ वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा या हंगामातील पाचवा विजय आहे.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २८ सामने झाले आहेत. २८ सामन्यांनंतर ऑरेंज कॅप किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलकडे कायम आहे. तर पर्पल कॅप दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाकडे कायम आहे.
#२८व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणारे ५ फलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज) –
१. केएल राहुल- ३८७ धावा, ७ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
२. मयंक अगरवाल – ३३७ धावा, ७ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
३. फाफ डु प्लेसिस – ३०७ धावा, ७ सामने (चेन्नई सुपर किंग्स)
४. डेविड वॉर्नर – २७५ धावा, ७ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
५. जॉनी बेअरस्टो – २५७ धावा, ७ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
#२८ व्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे ५ गोलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज) –
१. कागिसो रबाडा – १७ विकेट्स, ७ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
२. जसप्रीत बुमराह – ११ विकेट्स, ७ सामने (मुंबई इंडियन्स)
३. ट्रेंट बोल्ट – ११ विकेट्स, ७ सामने (मुंबई इंडियन्स)
४. राशिद खान – १० विकेट्स, ७ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
५. युझवेंद्र चहल- १० विकेट्स, ७ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)