---Advertisement---

IPL 2020 : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत केएल राहुल अव्वल क्रमांकावर कायम, तर पर्पल कॅप ‘या’ खेळाडूच्या डोक्यावर

On: शनिवार, ऑक्टोबर 31, 2020 10:00 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते.

शुक्रवारी (३० ऑक्टोबर) आयपीएल२०२० मधील ५० वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. हा सामना राजस्थानने ७ विकेट्सने जिंकल. या विजयामुळे राजस्थान १२ गुणांसह गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आले आहेत. तर पंजाब चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

या सामन्यात पंजाबकडून ख्रिस गेलने ९९ धावांची तर कर्णधार केएल राहुलने ४६ धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबने २० षटकात १८५ धावा केल्या आणि राजस्थानला १८६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून बेन स्टोक्सने ५० धांवांची तर संजू सॅमसनने ४८ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार स्टिव्ह स्मिथ(३१*), जॉस बटलर(२२*) आणि रॉबिन उथप्पा(३०) यांनी देखील छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे राजस्थानने या सामन्यात सहज विजय नोंदवला.

या सामन्यादरम्यान केएल राहुलने आयपीएलमध्ये या हंगामात ६०० धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा या हंगामात पार करणारा तो पहिला खेळाडू आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपही त्याच्याकडेच आहे. तर पर्पल कॅप दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाकडे कायम आहे.

#५०व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणारे ५ फलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज) – 

१. केएल राहुल- ६४१ धावा, १३ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
२. शिखर धवन – ४७१ धावा, १२ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
३. डेविड वॉर्नर – ४३६ धावा, १२ सामने (सनरायझर्स हैदराबाद)
४. विराट कोहली – ४२४ धावा, १२ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
५. देवदत्त पड्डीकल- ४१७ धावा, १२ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

#५०व्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे ५ गोलंदाज (आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज) – 

१. कागिसो रबाडा- २३ विकेट्स, १२ सामने (दिल्ली कॅपिटल्स)
२. जसप्रीत बुमराह- २० विकेट्स, १२ सामने (मुंबई इंडियन्स)
३. मोहम्मद शमी – २० विकेट्स, १३ सामने (किंग्स इलेव्हन पंजाब)
४. जोफ्रा आर्चर – १९ विकेट्स, १२ सामने (राजस्थान रॉयल्स)
५. युजवेंद्र चहल – १८ विकेट्स, १२ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---