आयपीएल २०२० स्पर्धा आता प्ले ऑफपर्यंत येऊन ठेपली आहे. रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना होत असून विजेतेपदाबरोबरच कोणता फलंदाज ‘ऑरेंज कॅप’ व कोणता खेळाडू ‘पर्पल कॅप’ मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केएल राहुल हा सध्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असून त्याने ६७० धावा केल्या आहेत. परंतू केएल राहुलचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. यावेळी दुसऱ्या स्थानावर डेविड वॉर्नर असून तो कर्णधार असलेला संघ सनरायझर्स हैदराबाद जर आयपीएलचा अंतिम सामना खेळला तर त्याला कमीत कमी ३ सामने खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे तो देखील केएल राहुलप्रमाणेच ‘ऑरेंज कॅप’चा दावेदार आहे. शिखर धवन ५२५ धावांसह, देवदत्त पड्डिकल ४७२ धावांसह तर विराट कोहली ४६० धावांसह या स्पर्धेत आहेत.
पर्पल कॅपच्या दावेदारांमध्ये कागिसो रबाडा २५ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ २३ विकेट्ससह मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांचेही संघ क्वॉलीफायरचा सामना खेळणार आहेत. तिसऱ्या स्थानावर असलेल्या जोफ्रा आर्चरचा संघ राजस्थान रॉयल्स स्पर्धेबाहेर गेल्याने त्याला पर्पल कॅपची संधी नाही तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा युझवेंद्र चहल २० विकेट्ससह तर मुंबई इंडियन्सचा ट्रेंट बोल्टही २० विकेट्ससह या स्पर्धेत आहेत.
‘ऑरेंज केप’ आणि ‘पर्पल कॅप’बद्दल थोडक्यात माहिती-
आयपीएल स्पर्धेत ‘ऑरेंज केप’ आणि ‘पर्पल कॅप’ या दोन अश्या कॅप (टोप्या) आहेत ज्या प्रत्येक खेळाडूला आपल्या डोक्यावर असाव्यात अशी इच्छा असते. परंतु ही कॅप मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला स्पर्धेत सातत्यपुर्ण खेळ करून दाखवावा लागतो. एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ‘ऑरेंज कॅप’ तर सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला ‘पर्पल कॅप’ दिली जाते.
हे दोन्ही मोठे ‘किताब आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दिवशी दिले जातात. हंगाम सुरू झाल्या पासून या कॅप वेगवेगळ्या खेळाडूंच्या डोक्यावर दिसतात. याला कारण असते स्पर्धेत खेळाडूंच्या कामगिरीत सतत येणारे चढउतार.
‘ऑरेंज कॅप’ साठी कोण कोण आहे शर्यतीत ?
1. के एल राहुल – 670 धावा
2. डेविड वॉर्नर – 529 धावा
3. शिखर धवन – 525 धावा
4. देवदत्त पड्डिकल – 472 धावा
5. विराट कोहली – 460 धावा
‘पर्पल कॅप’ साठी कोण कोण आहेत शर्यतीत ?
1. कागिसो रबाडा – 25 बळी
2. जसप्रीत बुमराह – 23 बळी
3. जोफ्रा आर्चर – 20 बळी
4. युझवेंद्र चहल – 20 बळी
5. ट्रेंट बोल्ट – 20 बळी
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितसाठी देश जास्त महत्त्वाचा का आयपीएल? माजी निवडकर्त्याच्या प्रश्नाने सोशल मीडियावर खळबळ
शतकांच्या ‘या’ मोठ्या विक्रमात पाकिस्तानी खेळाडूची हवा, विराट कोहलीवरही ठरला वरचढ
Eliminator: प्ले ऑफमध्ये पोहोचल्यानंतर हैदराबादच्या वॉर्नरचं कोहलीला ‘विराट’ चॅलेंज
ट्रेंडिंग लेख-
आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…
आयपीएल २०२०: प्रतिभा असूनही ‘हे’ पाच खेळाडू राहिले वंचित, नाही मिळाली संधी
मुंबईचे ३ धडाकेबाज खेळाडू, ज्यांना पुढील हंगामात केले पाहिजे रिलीझ