रावळपिंडी येथे मंगळवारी (३ नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध झिंबाव्बे संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना रंगला. या रोमहर्षक लढतीत झिंबाब्वे सुपर ओव्हरमध्ये विजयी ठरला. दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या विक्रमात त्याने हाशिम अमला, विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.
वनडेत सर्वात जलद १२ शतके करणारे खेळाडू
झिंबाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आझमने १२५ चेंडूत १२५ धावांची अफलातून खेळी केली होती. दरम्यान त्याने १३ चौकार आणि १ षटकारही मारला होता. हे आझमचे वनडे कारकिर्दीतील १२वे शतक होते. यासह वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान १२ शतके जडणारा तो दूसराच फलंदाज ठरला आहे. आझमला त्याच्या वनडे कारकिर्दीतील १२ शतके पूर्ण करण्यासाठी ७५ डावांची गरज पडली आहे.
या विक्रमाच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याने ७४ वनडे डावात एकूण १२ शतके लगावली आहेत, तर दक्षिण आफ्रिकाचा दिग्गज फलंदाज हाशिम अमला तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ८१ डावात हा पराक्रम केला आहे, तर भारताचा कर्णधार विराट कोहली ८३ वनडे डावात हा विक्रम करत चौथ्या स्थानावर आहे.
बाबर आझमची वनडे कारकीर्द
२६ वर्षीय बाबर आझमने ३१ मे २०१५ रोजी झिंबाब्वेविरुद्ध वनडे कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आजवर त्याने एकूण ७७ वनडे सामने खेळले आहेत. त्यातील ७५ डावात फलंदाजी करताना त्याने ३५८० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी ५५.९४ इतकी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चुरशीच्या सामन्यात झिम्बाब्वेकडून पाकिस्तान पराभूत; बाबर आझमचे शतक व्यर्थ
रोहितसाठी देश जास्त महत्त्वाचा का आयपीएल? माजी निवडकर्त्याच्या प्रश्नाने सोशल मीडियावर खळबळ
Eliminator: प्ले ऑफमध्ये पोहोचल्यानंतर हैदराबादच्या वॉर्नरचं कोहलीला ‘विराट’ चॅलेंज
ट्रेंडिंग लेख-
हैदराबादची प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री; ‘या’ ३ कारणांमुळे मुंबईचा दारुण पराभव