दिल्लीसाठी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची अशी आहेत समीकरणे –
या हंगामात आत्तापर्यंत १३ सामन्यांत ७ विजय मिळवणाऱ्या दिल्ली संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सोमवारी(२ नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यातून गुणतालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा संघ निश्चित होणार आहे, म्हणजेच या सामन्यात जो संघ जिंकेल तो १६ गुणांसह प्लेऑफमध्ये जागा पक्की करेल. त्यामुळे दिल्लीला हे सर्वात सोयीस्कर समीकरण असणार आहे, की सामना जिंका आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करा.
पण जर दिल्लीला बेंगलोरविरुद्ध पराभव स्विकारावा लागला तर…
जर दिल्लीला बेंगलोरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांना आशा करावी लागेल की मंगळवारी(३ नोव्हेंबर) होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद सामन्यात हैदराबाद पराभूत व्हावा. या सामन्यात जर हैदराबाद हारले तर दिल्ली १४ गुणांसह देखील प्लेऑफमध्ये सहज प्रवेश करतील.
पण जर हैदराबाद जिंकले तर मात्र त्यांना नेटरनरेटच्या आधारावर प्लेऑफमध्ये प्रवेश करावा लागेल. त्यांना बेंगलोरविरुद्ध मोठा पराभव स्विकारुन चालणार नाही. कारण आधीच हैदराबादचा नेटरनरेट १४ गुण मिळवू शकणाऱ्या सर्व संघांत सर्वाधिक आहे. तसेच त्यांना कोलकाता नाईट रायडर्सच्या नेटरनरेटचाही विचार करावा लागेल.
त्यामुळे दिल्लीला या गोष्टीवर लक्ष्य केंद्रित करावे लागेल की त्यांनी जरी प्रथम फलंदाजी केली आणि समजा त्यांनी १६० धावा केल्या तर बेंगलोर १८ पेक्षा कमी षटकात हे आव्हान पूर्ण करणार नाही. तसेच जर दिल्लीने प्रथम गोलंदाजी केली तर त्यांना १८ किंवा त्यापेक्षा कमी धावांनी पराभूत व्हावे लागेल. तरच त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पल्लवित राहतील.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर
पंचाच्या ‘त्या’ एका चुकीच्या निर्णयामुळे आमची आयपीएल ट्रॉफी हुकली, केएल राहुलचे मोठे वक्तव्य
जर असे झाले तरच कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफसाठी ठरणार पात्र, असे आहे समीकरण
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’