कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेली प्रतिष्ठित आयपीएल स्पर्धेच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. या व्हायरसमुळे यावर्षी जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग भारताबाहेर खेळवण्यात येत आहे. राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ यूएईत पोहोचले आहेत.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की, अनेक खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी करत आपल्या संघाला आयपीएलचा सामना जिंकून दिला आहे, तर काही फलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे संघाला पराभवाचं तोंडही पाहायला मिळाले आहे. जर असा प्रश्न विचारला की, असा कोणता फलंदाज आहे, ज्याने आयपीएलमध्येे शून्य धावेवर बाद न होता एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे?, याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.
चला तर मग जाणून घेऊया…
विराट कोहलीच्या नावावर आहे हा विक्रम
कोणत्याही संघाविरुद्ध शून्य धावेवर बाद न होता सर्वाधिक ८२५ धावा करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने हा कारनामा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केला आहे. विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३७.८४ च्या सरासरीने तब्बल ५४१२ धावा ठोकल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि ३६ अर्धशतकेही केली आहेत.
सुरेश रैनाचा दुसरा, तर एमएस धोनीचा लागतो तिसरा क्रमांक
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दिग्गज फलंदाज आणि मिस्टर आयपीएल या नावाने ओळखला जाणारा फलंदाज सुरेश रैनाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शून्य धावेवर बाद न होता ८१८ धावा कुटल्या आहेत. त्याचबरोबर धोनीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ७९४ धावा केल्या आहेत.
या यादीत आहे रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचाही समावेश
विराटने सीएसकेविरुद्धही शून्य धावेवर बाद न होता ७४७ धावा ठोकल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध शून्य धावेवर बाद न होता ७४५ धावा केल्या आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध ७३० आणि सनरायजर्स हैद्राबादविरुद्ध माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध ६६९ धावा ठोकल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-निवृत्तीनंतर आता या ५ क्षेत्रात दिसू शकतो एमएस धोनी
-भारतीय संघासाठी या ३ टी-२० सामन्यात सुरेश रैनाने होता कर्णधार
-लाईनीत उभं करत आपल्याच संघातील खेळाडूंची झाडाझडती घेणारा जंलटमन क्रिकेटर
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलमध्ये ‘या’ कारणामुळे होतो आरसीबी संघाचा ३० टक्के पराभव; जाणून घ्या स्वत: चहलच्या तोंडून…
-आयपीएल खेळण्यापूर्वी भारताच्या या खेळाडूने उरकून घेतला साखरपुडा
-‘तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी इकॉनॉमीमध्ये बसेल,’ धोनीचा दिलदारपणा; स्टाफ मेंबरला आपली सीट केली ऑफर