---Advertisement---

क्रिकेटर आयपीएल खेळायला दुबईला तर गेले, परंतू रुमच्या बाल्कनीतून साधावा लागतोय संवाद

On: शनिवार, ऑगस्ट 22, 2020 6:28 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 (आयपीएल) साठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झालेल्या खेळाडूंना सहा दिवस त्यांच्या खोल्यांमध्येच रहावे लागणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी बाल्कनीतून एकमेकांशी संवाद साधला आणि संघाच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या फिटनेस कार्यक्रमाचे पालन केले.

राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे खेळाडू गुरुवारी संध्याकाळी दुबईला पोहोचले, तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ रात्री अबू धाबी येथे पोहोचला. राजस्थान रॉयल्स संघाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) नुसार पहिल्या दिवशी विमानतळावर कोविड -19चाचणी पूर्ण केली. किंग्ज इलेव्हन पंजाबने शुक्रवारी पुन्हा चाचणी घेतली.

बीसीसीआयच्या एसओपीनुसार दुबईत पोहचल्यानंतर पहिल्या, तिसर्‍या आणि सहाव्या दिवशी खेळाडूंची ही तपासणी केली जाईल, त्यानंतर संघ लीगसाठी प्रशिक्षण सुरू करू शकतात. सहा दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत कोणालाही त्यांची खोली सोडण्याची परवानगी नाही.

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनेही सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची दुबईतील पहिली सकाळ तो दाखवत आहे.

शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि मुंबई इंडियन्स युएईला शुक्रवारी रवाना झाले. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आठवड्याच्या शेवटी युएईकडे रवाना होतील.

https://www.instagram.com/p/CEEzMjSHhpu/

राजस्थान रॉयल्सने संघाच्या एका सूत्राने पीटीआयशी बोलतांना सांगितले की, ‘खेळाडू बाहेरील क्षेत्राचा पर्यायी वापर करू शकतात. किंग्ज इलेव्हन पंजाबचे खेळाडू बाल्कनीतून आपल्या शेजार्‍यांशी बोलू शकतात. परंतु दुबईतील उष्णतेमुळे ते दिवसा बाहेर येऊन असे करु शकणार नाहीत.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---