---Advertisement---

दुर्दैव: १९ वर्षांखालील विश्वचषक चषकातील हिरो बनला आज ‘नेट बॉलर’, दिल्ली कॅपिटल्सला…

---Advertisement---

मुंबई । डावखुरा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवान 19 वर्षांखालील वर्षांखालील विश्वचषक आणि पहिल्या आयपीएलमध्ये स्विंग गोलंदाजीने छाप सोडली होती. आता 13 वर्षानंतर तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा नेट बॉलर म्हणून युएईला जाणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि केकेआर यांच्याकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळलेला संगवानला नेट गोलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे. त्यांच्यासोबत पवन सुयाल हा देखील असणार आहे.

दिल्लीचा अष्टपैलू प्रणू विजयरन, रेल्वेचा डावखुरा फिरकीपटू हर्ष त्यागी आणि डावखुरा फिरकीपटू रजत गोयल आणि वेगवान गोलंदाज बॉबी यादव हेदेखील दिल्ली संघात नेट गोलंदाज असतील.

डीडीसीएच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, “सांगवान आणि सुयाल नेट गोलंदाज म्हणून काम करत आहेत. प्रंशू आणि हर्षही एकत्र जातील. हर्ष दिल्लीच्या 19 वर्षाखालील संघापासून  खेळत आहे. रजत हा स्थानिक क्लबचा क्रिकेटपटू आहे तर बॉबी उत्तर प्रदेशचा आहे.”

2008 साली विराट कोहलीच्या नेतृत्वात 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणार्‍या संघात संगवान सदस्य होता. तसेच दिल्ली संघाने या खेळाडूला विराट कोहलीऐवजी दिल्ली संघात घेतले होते. 2013 मध्ये डोप टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली होती, बोर्डाने बंदी घातलेला तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---