---Advertisement---

चाहत्याने विचारले आयपीएल २०२०मध्ये कोणाला करणार मंकडींग, अश्विनने दिले हे उत्तर…

On: बुधवार, जानेवारी 1, 2020 6:55 PM
---Advertisement---

आयपीएल 2020 (IPL 2020) चा 13 वा हंगाम (13th Season) येत्या 29 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 2019 आयपीएलमध्ये पंजाबचा कर्णधार असणारा आर अश्विन आता दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणार आहे. पण त्याआधीच त्याने मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही गरज पडली तर मंकडींगचा (Mankading) करणार असल्याचे सांगितले आहे.

2019 आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीलाच मंकडींग प्रकरण चांगलेच गाजले होते. या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) कर्णधार अश्विनने (R Ashwin) राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलरला (Jos Buttler) मंकडींग करुन बाद केले होते.

याचीच पुनरावृत्ती म्हणून अश्विन आता मंकडींग 2020च्या आयपीएलमध्ये करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. अश्विनने #askashचा वापर करत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांना त्याला प्रश्न विचारण्यास सांगितले होते.

यावेळी अश्विनला असे कोणते खेळाडू आहेत ज्यांना तुम्ही आयपीएलमध्ये मंकडींगच्या साहाय्याने विकेट घेऊ इच्छिता?, असा प्रश्न विचारला असता अश्विनने उत्तर दिले की, “कोणताही खेळाडू जो क्रिजच्या बाहेर जाईल त्याला मी मंकडींगच्या साहाय्याने बाद करेल.”

आयपीेएलच्या मागील हंगामात अश्विनने मंकडींगच्या साहाय्याने बटलरला बाद केल्याने बरीच चर्चा रंगली. अनेकांनी अश्विनचे कृत्य खेळाडूवृत्तीचे नव्हते असे म्हटले. तर काहींनी त्याला पाठिंबा दिला होता. तसेच अश्विनने जे केले ते नियमाला धरुन होते असे म्हटले होते.

अश्विनने आतापर्यंत 139 आयपीएलचे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 26.48 च्या सरासरीने 125 विकेट्स घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---