---Advertisement---

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! जयपुरबरोबर या शहरातही होणार राजस्थानचे आयपीएल सामने

On: शुक्रवार, फेब्रुवारी 28, 2020 12:14 PM
---Advertisement---

येत्या 29 मार्चपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या सर्वात पहिल्या मोसमात (2008) विजेतेपद मिळवणारा राजस्थान रॉयल्स संघ (Rajasthan Royals) यंदा जयपुर व्यतिरिक्त गुवाहाटीच्या मैदानावरही त्यांचे घरचे सामने खेळणार आहे.

राजस्थानच्या फ्रेंचायझीने जाहीर केले आहे की, ‘यंदाच्या मोसमात राजस्थान गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवरती त्यांच्या 2 घरच्या सामन्यांचे आयोजन करणार आहे’. तर, बीसीसीआयने याला संमती देत सामन्यांची तारिख देखील निश्चित केली आहे.

आज (27 फेब्रुवारी) बीसीसीआयने पत्रकार परिषदेत माहिती दिली की, “गुवाहाटी येथील स्टेडियमवर राजस्थान 5 आणि 9 एप्रिल रोजी 2 घरच्या सामन्यांचे आयोजन करणार आहे.” बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, “राजस्थान गुवाहाटीत 5 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तर 9 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळणार आहे. तसेच, हे दोन्ही सामने रात्री 8 वाजता खेळले जातील.”

राजस्थान रॉयल्सचा या मोसमातील पहिला सामना 2 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध चेन्नईच्या स्टेडियमवर होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---