---Advertisement---

आयपीएलमध्ये पहा कोणत्या संघाकडे किता जागा रिक्त…

On: मंगळवार, डिसेंबर 17, 2019 1:29 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा लिलाव 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. 332 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली गेली आहे. यापैकी केवळ 73 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत.  या हंगामासाठी, सर्व संघांनी मिळून 35 विदेशी खेळाडूंसह 127 खेळाडू कायम ठेवले आहेत. या लिलावामध्ये पंजाबच्या पर्समध्ये सर्वाधिक रक्कम आहे.

लिलावात खेळाडू खरेदी करण्यासाठी पंजाबकडे 42.70 कोटी रुपये आहेत, तर प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्या मालकीच्या या संघाने आतापर्यंत खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 42.30 कोटी रुपये खर्च केले आहेत.

आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वी खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक पैसे खर्च केले आहेत. या संघाने आतापर्यंत 71.95 कोटी रुपये खर्च केले आहेत.

खर्चाच्या बाबतीत चेन्नई सुपर किंग्ज दुसर्‍या क्रमांकावर आहे. सीएसकेने आपल्या खेळाडूंना राखण्यासाठी 70.40 कोटी रुपये खर्च केले आहेत. लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादनेही 68 कोटी रुपये खर्च केले आहेत.

लिलाव दरम्यान, आयपीएलमध्ये असे चार संघ आहेत जे 10 पेक्षा अधिक खेळाडू खरेदी करू शकतात. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरजवळ जास्तीत जास्त 12 जागा रिक्त आहेत. यात सहा परदेशी खेळाडू आहेत. यानंतर दिल्ली कॅपिटल्समध्ये 11 खेळाडूची जागा रिक्त आहेत.

दिल्लीच्या संघ पाच परदेशी खेळाडूंचा संघात समावेश करु शकतात. केकेआरच्या 11, राजस्थान रॉयल्सच्या 11, किंग्ज इलेव्हन पंजाब 9, हैदराबाद आणि मुंबईच्या संघात प्रत्येकी 7 जागा रिक्त आहेत.

आरसीबीने ट्रेड विंडो अंतर्गत संघातील 12 खेळाडूना मुक्त केले. त्याचवेळी हैदराबादने सर्वात कमी पाच खेळाडू सोडले. सर्वात धक्कादायक निर्णय केकेआरने घेतला. रॉबिन उथप्पा आणि ख्रिस लिन यासारख्या खेळाडूंना त्याने वगळले.

https://twitter.com/Maha_Sports/status/1205478168577994752

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---