आयपीएल २०२० चा ५५ वा सामना अबु धाबी येथे सोमवारी (२ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट्सने जिंकला. या विजयासह दिल्लीने प्लेऑफमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली. हे स्थान मिळवण्यात दिल्लीचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेने मोलाचे योगदान दिले.
नाणेफेक जिंकत दिल्लीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि बेंगलोर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १५२ धावा केल्या होत्या. या धावांचे आव्हान बलाढ्य दिल्ली संघाने १९ षटकात ४ विकेट्स गमावत १५४ धावा करत पूर्ण केले.
अजिंक्य रहाणेला दिली केवळ ६ सामन्यात संधी
रहाणेला दिल्लीने १४ पैकी केवळ ६ सामन्यात संधी दिली. यात त्याने १५, २, ८, ०, २६ व ६० धावा केल्या. पहिल्या ५ सामन्यात चांगलाच फ्लॉप ठरलेल्या रहाणेला या महत्त्वाच्या सामन्यात संधी देण्याचा कर्णधार श्रेयस अय्यरचा निर्णय अतिशय योग्य ठरला. रहाणेनेही मिळालेल्या संधीचे चांगलेच सोने केले.
अजिंक्य रहाणेची धडाकेबाज कामगिरी
या सामन्यात संयमाने खेळणे गरजेचे होते व टी२० प्रकारात स्फोटक खेळीबरोबर संयमही किती महत्त्वाचा आहे हे रहाणेने दाखवून दिले. दिल्ली संघाकडून फलंदाजी करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली होती. संघाच्या १९ धावा झालेल्या असताना पृथ्वी शॉसारखा मोठा खेळाडू बाद झाला. त्यानंतर दिल्लीची खिंड लढवण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने फलंदाजीसाठी रहाणेला पाठवले.
रहाणेनेही चांगली फटकेबाजी करत ४६ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ६० धावांची दमदार खेळी केली. रहाणेसोबतच धवननेही ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. रहाणेने दुसऱ्या विकेटसाठी शिखर धवनसोबत ८८ धावांची मोठी भागीदारी रचली.
बेंगलोर संघाकडून गोलंदाजी करताना शाहबाज अहमदने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबतच मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक धावा कुटल्या. त्याने ४१ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. त्याच्यासोबतच एबी डिविलियर्स (३५) आणि कर्णधार विराट कोहलीने (२९) धावा केल्या.
दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना एन्रीच नॉर्किएने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्यासोबतच कागिसो रबाडाने २, तर आर अश्विनने १ विकेट आपल्या खिशात घातली.
महत्त्वाच्या बातम्या-
-“तु्म्ही अजिंक्य रहाणेला संघात घ्या,” क्रिकेट विशेषज्ञाचा धोनीच्या सीएसकेला सल्ला
-अखेर मुंबई विरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळाली संधी; पाहा असा आहे ११ जणांचा दिल्ली संघ
-पंजाबी मुंडा शिखर धवन शिकवतोय लाजाळू अजिंक्य रहाणेला भांगडा, पहा व्हिडीओ…
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?