---Advertisement---

दिल्ली विरुद्ध बेंगलोर सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी

On: मंगळवार, ऑक्टोबर 6, 2020 11:07 AM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 19 व्या सामन्यात युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोरला 59 धावांनी पराभूत केले. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबी 20 षटकांत केवळ 137 धावाच करू शकला. या सामन्यादरम्यान अनेक विक्रमांची नोंद झाली. या लेखात आपण सामन्यात झालेल्या काही विक्रमांवर नजर टाकू.

• या सामन्यात 10 धावा केल्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या सामन्यात त्याने 43 धावांची खेळी केली.

• या हंगामातील हा असा 15 वा सामना होता, ज्यामध्ये कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

• दिल्लीने पॉवरप्लेमध्ये 63 धावा ठोकल्या. या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दिल्लीने पॉवरप्लेमध्ये ठोकलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

• गुणतालिकेत 8 गुण घेणारा दिल्ली हा या हंगामातील पहिलाच संघ ठरला आहे.

• दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने या सामन्यात 32 धावांची खेळी केली आणि आयपीएल कारकीर्दीत 4700 धावा पूर्ण केल्या.

• या सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने विराट कोहलीला बाद केले. 2018 नंतर त्याने तिसऱ्यांदा कोहलीला तंबूचा मार्ग दाखवला.

• कागिसो रबाडा आयपीएल 2020 मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---