सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२०चा २८वा सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या सामन्याची सुरुवात होईल. या दोन्ही संघात झालेल्या शेवटच्या ५ सामन्यांविषयी बोलायचं झालं तर, बेंगलोरने फक्त एकदा कोलकाताला पराभूत केले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोर संघाने या हंगामात खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आहेत. हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर कोलकाता संघाने या हंगामात खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले आहेत. मात्र त्यांचा नेट रन रेट जास्त असल्यामुळे गुणतालिकेत त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.
रसेल आणि नरेनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
कोलकाता संघाचे २ खेळाडू बेंगलोरविरद्ध खेळताना न दिसण्याची शक्यता आहे. त्यांचा फिरकीपटू गोलंदाज सुनिल नरेन हा त्याच्या गोलंदाजी ऍक्शनमुळे वादात सापडला आहे. तर अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याला मागील सामन्यात दुखापत झाली होती. अशात या दोघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान नाही मिळाले, तर त्यांच्याऐवजी टॉम बँटन आणि लॉकी फर्ग्युसन बेंगलोरविरुद्ध खेळतील.
कोहलीच्या शानदार फॉर्ममुळे संघाला अपेक्षा
बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात खूप खराब फॉर्ममध्ये होता. पण गेल्या काही सामन्यांपासून विराट पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. मागील चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ९० धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. त्यामुळे तो कोलकाताविरुद्धही तो दमदार फलंदाजी करेल अशी संघाला अपेक्षा असेल.
दोन्ही संघातील सर्वात महागडे खेळाडू
कोलकाता संघाचा सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्स हा आहे. कोलकाताने त्याला १५.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर सुनिल नरेन हा १२.५० कोची रुपयांसह कोलकाताचा दूसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. तर दूसऱ्या बाजूला बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली हा संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल २०२० लिलावात बेंगलोरने त्याला १७ कोची रुपयांना विकत घेतले होते. तर एबी डिविलियर्स हा त्याच्या ११ कोटी रुपयांच्या किंमतीसह बेंगलोरचा दूसरा सर्वात महागडा खेळाडू आहे.
खेळपट्टीबद्दल माहिती आणि हवामान अहवाल
शारजाहमधील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ राहील. तेथील तापमान २३ ते ३७ डिग्री सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शारजाहच्या खेळपट्टीमुळे फलंदाजांना फायदा होऊ शकतो. तसेच स्लो विकेट असल्यामुळे फिरकीपटूंनाही खूप मदत मिळेल. शारजाहमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल. कारण त्या मैदानावर झालेल्या मागील १३ टी२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचा विजय मिळवण्याचा दर ६९% इतका आहे.
शारजाह मधील खेळपट्टीवरील सामन्यांबद्दलची आकडेवारी
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी२० सामने : १३
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : ९
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : ४
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: १४९
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: १३१
कोलकाताचा विजय मिळवण्याचा दर बेंगलोरपेक्षा जास्त
आयपीएलमध्ये कोलकाताचा विजय मिळवण्याचा दर ५२.९८% इतका आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण १८४ सामने खेळले आहेत. त्यातील ९६ सामन्यात विजय तर ८८ सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. दूसऱ्या बाजूला बेंगलोरचा आयपीएलमधील विजय दर ४७.८१% आहे. त्यांनी आतापर्यंत १८७ सामने खेळले आहेत आणि त्यातील ८८ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. तर ९५ सामने गमावले आहेत. उर्वरित ४ सामने अनिर्णित राहिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020 : पाहा सध्या कोण आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी
‘मला स्वत: वर विश्वास होता…’, हैदराबादविरुद्ध विजय मिळवल्यानंतर तेवतियाने दिली प्रतिक्रिया
आयपीएल २०२०: मुंबईने दिल्लीवरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ