नवी दिल्ली। आयपीएल२०२०च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. भारत सरकारने बीसीसीआयला यूएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबरपासून होणार आहे आणि अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन यावेळी युएईमध्ये होणार आहे.
आयपीएलमध्ये जेव्हाही सर्वोत्तम फलंदाजांबद्दल चर्चा केली जाते, तेव्हा त्यामध्ये विराट कोहली, एबी डिविलियर्स, ख्रिस गेल, एमएस धोनी, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर यांसारख्या खेळाडूंचे नाव घेतले जाते. परंतु या सर्व दिग्गज फलंदाजांवर भारताचा एक फलंदाज भारी पडला आहे. तो खेळाडू इतर कोणी नसून भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आहे, जो मागील ३ हंगामापासून आयपीएलचा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.
मागील ३ हंगामापासून पंत आहे अव्वल खेळाडू
आयपीएलच्या मागील ३ हंगामाबद्दल बोलायचं झालं, तर रिषभ पंतने फलंदाज म्हणून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मागील ३ हंगामात पंत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे. इतकेच नाही तर मागील ३ हंगामांमध्ये पंतने स्पर्धेतील सर्वात मोठी खेळी केली आहे.
पंतने आयपीएलच्या मागील ३ हंगामात एकूण १५३८ धावा केल्या आहेत. पंतने आयपीएल २०१७मध्ये १४ सामन्यात २६.१४ च्या सरासरीने केवळ ३६६ धावा केल्या होत्या. यामध्ये केवळ २ अर्धशतकांचा समावेश होता. परंतु २०१८मध्ये पंतने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आयपीएल २०१८मध्ये १४ सामने खेळत ५२.६२ च्या सरासरीने ६८४ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ अर्धशतके आणि १ शकत ठोकले होते. त्यानंतर त्याने आयपीएल २०१९ मध्ये १६ सामने खेळताना ३७.५४ च्या सरासरीने ४८८ धावा केल्या. अशा प्रकारे त्याने १५३८ धावा केल्या, ज्या इतर फलंदाजांनी मागील ३ हंगामात केलेल्या धावांपेक्षा अधिक होत्या. मागील ३ हंगामात शिखर धवनने १४९६, डेव्हिड वॉर्नरने १३३३ धावा केल्या आहेत.
पंतने ठोकले आहेत सर्वाधिक षटकार
षटकारांबद्दल बोलायचं झालं, तर एमएस धोनी, आंद्रे रसल, कायरन पोलार्ड आणि रोहित शर्मा यांची चर्चा होते. परंतु आयपीएलच्या मागील ३ हंगामात या सर्वांपेक्षाही पंतने अधिक षटकार ठोकले आहेत. पंतने मागील ३ हंगामात ८८ षटकार ठोकले आहेत. रसलच्या नावावर ८३ षटकार आहेत. त्याचबरोबर ख्रिस गेलने ७५ आणि एबी डिविलियर्सने ७२ षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयने नाही म्हटले नाही, पण विवोनेच घेतली प्रायोजक होण्यापासून माघार
-कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या अमित शहांकडे आयपीएल न होण्यासाठी साकडे, पहा कुणी केलीय मागणी
-२०१९ वर्ल्डकपमधील ५ पैकी हे शतक रोहित शर्माचे खास, कारणही आहे विशेष
ट्रेंडिंग लेख-
-सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
-कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन