क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक वेगवान गोलंदाज आहेत ज्यांना १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यात यश आले आहे. वेगवान गोलंदाजांना एकाच वेगाने गोलंदाजी करणे सोपे नव्हते, परंतु असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी सतत प्रतितास १४५ ते १५० किमी वेगाने गोलंदाजीची केली आहे.
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आहे. शोएब अख्तरने आपल्या कारकीर्दीत अनेक खतरनाक चेंडू फेकले, त्यामध्ये त्याने एक चेंडू १६१.३ किमी प्रतितास वेगाने फेकण्याचा विश्वविक्रम केला आहे.
शोएब अख्तरप्रमाणेच सध्याच्या युगातही अनेक धोकादायक गोलंदाज आहेत, ज्यांनी कधीकधी १५० किमी प्रतितास वेगाच्या अधिक गतीने चेंडू फेकला आहे. यातील काही खेळाडू आयपीएलमध्येही खेळत आहेत. आयपीएलमध्ये खेळणार्या वेगवान गोलंदाजांमधील ५ खेळाडूंमध्ये अख्तरचा हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे.
हे ५ गोलंदाज आयपीएलमध्ये शोएब अख्तरसारखी जलद गोलंदाजी करू शकतात
जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah)
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्याचा जगातील सर्वात उत्तम वेगवान गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीतून हे सिद्ध केले आहे की त्याच्या गोलंदाजीत बरीच अचूकता तसेच प्रचंड वेग आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत भारतासह आयपीएलमध्येही चेंडूची गती दाखविली आहे.
या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघातून तो खेळात आहे. तो धोकादायक वेगाने गोलंदाजी करून या मोसमात शोएब अख्तरच्या वेगवान चेंडूचा विक्रमही तोडू शकतो. तशी त्याची क्षमता देखील आहे.
पॅट कमिन्स (Pat Cummins)
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने अतिशय धोकादायक गोलंदाज म्हणून आपला ठसा उमटविला आहे. गेल्या काही वर्षांपासून पॅट कमिन्सने सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आहे आणि तिन्ही क्रिकेट प्रकारामध्ये ऑस्ट्रेलिया संघात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
पॅट कमिन्स आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. कमिन्सच्या कामगिरीमुळेच केकेआरने त्याला मोठी रक्कम देऊन त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. पॅट कमिन्समध्ये या आयपीएल मोसमात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर शोएब अख्तरचा विक्रम तोडण्याची क्षमता आहे.
कागिसो रबाडा (Kagiso Rabada)
दक्षिण आफ्रिकेच्या संघात काही वर्षांपूर्वी स्पीड स्टार खेळाडूबद्दल चर्चा व्हायची तेव्हा डेल स्टेनचे नाव समोर यायचे. तसे, डेल स्टेनने त्याच्या वेगवान गोलंदाजीचा दबदबा निर्माण केला देखील होता. गेल्या काही वर्षात डेल स्टेनच्या दुखापतीनंतर युवा प्रतिभावान वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने त्याच्या सारखाच दबदबा निर्माण केला आहे.
रबाडा सतत एका गतीने वेगवान गोलंदाजी करू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच आयपीएलमध्ये कागिसो रबाडाची गोलंदाजी जबरदस्त आहे. या टी२० स्पर्धेमध्ये रबाडा दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळत आहे. तो देखील सर्वात वेगवान चेंडू या मोसमात टाकू शकतो.
ट्रेंट बोल्ट (Trent Bolt)
आपल्या वेगवान गोलंदाजांमुळे न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांत बरेच नाव मिळवले आहे. न्यूझीलंडच्या यशामध्ये वेगवान गोलंदाज टिम साउदी आणि ट्रेंट बोल्ट याचे मोलाचे योगदान आहे. ट्रेंट बोल्ट, बर्याच वर्षांपासून खेळत आहे, त्याने आपल्या जबरदस्त स्विंग गोलंदाजीबरोबरच वेगवान गोनंदाजीनेही ठसा उमटविला आहे.
ट्रेंट बोल्टची गोलंदाजी धोकादायक असते. आयपीएलमध्ये बोल्ट यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. या हंगामात, तो त्याच्या स्वत: च्या वेगवान गोलंदाजीने सामना जिंकून देऊ शकतो. या हंगामात ट्रेंट बोल्डदेखील शोएब अख्तरचा विक्रम मागे टाकू शकतो.
जोफ्रा आर्चर (Joffra Archer)
इंग्लंडचा युवा प्रतिभावान वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. जोफ्रा आर्चर हा मूळचा कॅरेबियन खेळाडू आहे, जो इंग्लंड संघाकडून यशस्वीरित्या खेळत आहे. आर्चरने आपल्या शानदार कामगिरीमुळे इंग्लंडकडून तिन्ही स्वरूपात आपला उत्तम खेळ दाखवला आहे.
आर्चरने आपल्या वेगाने खूप प्रभावित केले. याच कारणास्तव राजस्थान रॉयल्स संघानेही त्याला आयपीएलमध्ये समाविष्ट केले. आयपीएलमध्ये जोफ्राने आपल्या वेगवान गोलंदाजीने चांगला प्रभाव पाडला आहे. त्याच्या या जबरदस्त गोलंदाजीने कदाचित तो शोएब अख्तरच्या वेगवान चेंडूचा विक्रम मोडू शकेल.
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमध्ये येत्या काळात ६०० विकेट्सचा टप्पा गाठू शकतील असे ३ गोलंदाज
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला धू धू धुणारा क्रिकेटर आज कुणाला आठवतही नाही
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल टीमला आलं टेन्शन, या कारणाने ऑस्ट्रेलिया इंग्लंडचे खेळाडू नाही खेळणार पहिल्या आठवड्यात
आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी आणखी दोन कंपन्यांनी दाखवला इंटरेस्ट
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूची पत्नी आहे मेकअप आर्टिस्ट