इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने प्रथमच अंतिम सामन्यात धडक दिली आहे. क्वालिफायर 2 मध्ये दिल्लीने सनरायझर्स हैदराबादला 17 धावांच्या फरकाने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने हैदराबादला 190 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वातील हैदराबादला निर्धारित 20 षटकात 172 धावाच करता आल्या. हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली त्यांनी 44 धावांत तीन गडी गमावले. परंतु केन विलियम्सनने पुढे संघाला एक आशा दिली.
विलियमसन पव्हेलियनमध्ये परतल्यानंतर अब्दुल समद हा दिल्लीसाठी त्रासदायक ठरला. सामना दिल्लीच्या हातातून सरकताना दिसला, पण कागिसो रबाडाने १९व्या षटकात तीन गडी बाद करीत संपूर्ण डाव फिरवला. या सामन्यात रबाडाने २९ धावा देऊन एकूण 4 बळी घेतले.
अब्दुल समद, राशिद खान आणि श्रीवत्स गोस्वामी यांना 19 व्या षटकात रबाडाने बाद करत हैदराबादची लय खराब केली. रबाडाने तीन चेंडूत तीन बळी घेतले. १९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने समदला किमो पॉलच्या हातून झेलबाद केले. चौथ्या चेंडूवर राशिद खानला पटेलच्या हातून झेलबाद केले, तर पाचव्या चेंडूवर गोस्वामीला स्टॉयनिसच्या हातून झेलबाद केले.
परंतु त्यानंतरही हॅट्रिक त्याच्या नावावर नोंदवता आली नाही. खरं तर राशिद बाद झाल्यावर रबाडाने पुढचा चेंडू वाईड फेकला. या अतिरिक्त चेंडूनंतर त्याने गोस्वामीची विकेट घेतली. नियमानुसार, गोलंदाजाने सलग तीन वैध चेंडूत तीन बळी घेतल्यास त्याला हॅट्रिक मानले जाते. परंतु रबाडाने मध्येच वाईड चेंडू फेकल्याने हॅट्रिक त्याच्या नावावर होऊ शकली नाही.
हॅटट्रिकबाबत कोणताही नियम नाही
क्रिकेटच्या नियम पुस्तकात देण्यात आले आहेत. फलंदाजाची बॅट, खेळपट्टी, गोलंदाजीचा चेंडू, पंचांची चिन्हे, मैदानावरील खेळाडूंचे वर्तन, चेंडूचा आकार, चौकारांची लांबी, धावा देण्याचे नियम या सर्व गोष्टी क्रिकेटच्या नियमाच्या पुस्तकात आहेत, परंतु हॅट्रिकशी संबंधित कोणताही अधिकृत नियम यात नाही. नियम 22 मध्ये वाइड चेंडूचे संपूर्ण स्पष्टीकरण दिले गेले आहे, परंतु वाइड चेंडूवरील हॅट्रिकबद्दल कोणतेही नियम यात नाहीत.
कोणताही अधिकृत नियम नसल्याने. वाईड चेंडूवरही गोलंदाजाला हॅट्रिक घेण्याची संधी मिळते. परंतु त्याच परिस्थितीत जेव्हा फलंदाज यष्टीचीत किंवा हिटविकेट होतो. तसेच गोलंदाज दोन वाईड चेंडूपैकी एकावरही विकेट घेण्यास असमर्थ ठरला, तर तो हॅट्रिकची संधी गमावतो.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख-
-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा






