आयपीएल2020 (IPL 2020) चा 13 वा हंगाम (13th Season) अगदीच जवळ आला आहे. त्यासाठी सर्व फ्रँचायझी संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. परंतु यापूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम करनने (Tom Curran) आयपीएलमध्ये आपली खेळण्याची शैली उघड करणार नसल्याचे सांगितले.
येत्या ऑक्टोबर 2020मध्ये ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup) होणार आहे. हे लक्षात घेता करन आयपीएलमध्ये त्याची शैली उघड करणार नसल्याचे त्याने सांगितलेे आहे.
यावर्षीच्या आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) करनला त्याच्या मूळ किंमतीत 1 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यावेळी ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार करन म्हणाला की, “जर मी भारतीय क्रिकेटपटूंसमोर नेट्समध्ये गोलंदाजी करणार असेल, तर मी त्यांना माझ्या सर्व कला दाखवणार नाही.”
त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघातील जॉस बटलर आणि बेन स्टोक्स या इंग्लंडच्या खेळाडूंबद्दल बोलताना करन म्हणाला, “जॉस बटलर (Jos Buttler), बेन स्टोक्स (Ben Stokes) या खेळाडूंकडून मोठा फायदा आहे. मला असे वाटते की, आपण खरोखर यांच्याकडून खूप शिकू शकतो.’
‘जॉसशी बोलून मी फलंदाजीबद्दलही शिकेल. अशावेळी तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकता,” असेही करन यावेळी म्हणाला.
यावेळी 24 वर्षीय करन आयपीएलपूर्वी म्हणाला की, यावेळी माझे सर्व लक्ष स्वत:ची सुधारणा करण्यावर असेल. तसेच आयपीएलसारख्या व्यस्त असणाऱ्या स्पर्धेत ओळखीचे चेहरे असल्यामुळे मदत मिळेल.
“मी खरोखरच या प्रतिक्षेत आहे. मी यापूर्वी आयपीएलमधील खेळाडूंबरोबर क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे तेथे खेळणे मला अधिक सोपे होईल. विशेषत: भारतात जिथे वेळापत्रक खूप व्यस्त असते. तिथे ओळखीचे चेहरे असतात तेव्हा चांगले असते,” असेही करन यावेळी म्हणाला.
दुसरी कसोटी: शमी, बुमराह गोलंदाजीत चमकले मात्र भारतीय फलंदाजांची पुन्हा हाराकिरी
वाचा????https://t.co/I8gzkSq8pb????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020
रविंद्र जडेजाने घेतलेला शतकातील सर्वोत्तम एकहाती झेल पाहिला का?
वाचा????https://t.co/eZDCOtCsSu????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ @imjadeja— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020