fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजस्थान रॉयल्सचा संघ दुबईत रात्री करतोय सराव; जाणून घ्या काय आहे कारण

August 27, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । आयपीएलच्या 13 वा हंगाम सुरु होण्यास सुमारे तीन आठवडे बाकी आहेत. या स्पर्धेसाठी सर्व संघ युएईमध्येही पोहोचले आहेत. युएईमध्ये पोहोचल्यानंतर सर्व खेळाडूंना 6 दिवस अलग रहावे लागणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गुरुवारपासून तीन आठवड्यांच्या प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ करणार आहे.

खेळाडू जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात प्रशिक्षण घेतील.  त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने प्रशिक्षण सुरू केले आहे. राजस्थानने बुधवारी रात्री प्रशिक्षण सुरु केले.

आरसीबी क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माइक हसन म्हणाले, “खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत विविध वातावरणात वेळ घालवला आहे. फिटनेस आणि प्रशिक्षणाचे विविध स्तर होते. म्हणून, प्रत्येकासाठी एक प्रकारचे प्रशिक्षण सत्र तयार करणे हा योग्य मार्ग ठरणार नाही.”

मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच म्हणाले की, “सुरुवातीला गटात प्रशिक्षण देण्याची योजना आखली होती जेणेकरून फलंदाजांना दीर्घ विश्रांतीनंतर पुरेसा वेळ मिळेल. संपूर्ण संघाला एकत्र प्रशिक्षण न दिल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट अकादमीमध्ये आरसीबीचे खेळाडू प्रशिक्षण घेतील.”

पंजाब आणि राजस्थानही सज्ज

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने सरावाला सुरुवात केली आहे. दुबईची उष्णता टाळण्यासाठी या संघांनी संध्याकाळी सराव करण्याची योजना आखली आहे. किंग्ज इलेव्हन आणि राजस्थान रॉयल्स हे संघ येथे सर्वात आधी येथे पोहोचले होते.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ शुक्रवारी युएईमध्ये पोहोचले. त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी गुरुवारी संपला.  म्हणजेच आयपीएलचे तीन कर्णधार कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी गुरुवारपासून सराव करताना दिसतील.  प्रथम सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट होईल. कोलकाता नाईट रायडर्सची टीम गेल्या गुरुवारी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे पोहोचली.


Previous Post

कोलकाता नाइट रायडर्स संघाला दुसरा झटका; हा खेळाडू झाला स्पर्धेबाहेर

Next Post

खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माने दिले हे वचन

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@mipaltan
IPL

DC vs MI : नवख्या पंतसमोर अनुभवी रोहितचे आव्हान, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Next Post

खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माने दिले हे वचन

आयपीएल २०२० सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या यूएईतील कोरोनाची परिस्थिती, आतापर्यंत झालाय इतक्या लोकांचा मृत्यू

प्रेग्नंसीची बातमी गुप्त ठेवण्यासाठी विराट-अनुष्काचे होते असे नियोजन

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.