युएईमध्ये सध्या आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु चालू आहे. या हंगामादरम्यान अनेकदा खेळाडू विशेषत: कर्णधार एकावर एक अशा २ टोप्या घालताना दिसले आहेत. एवढेच नाही तर आयपीएलच्या आधीही झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांमध्येही क्रिकेटपटू २ टोप्या घातलेले दिसले. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की खेळाडू असे का करत आहेत. तसेच गोलंदाज गोलंदाजी करताना त्यांच्या टोप्या पंचांकडे का देत नाहीत? खरंतर यामागे कोरोना व्हायरसनंतर आयसीसीकडून घालण्यात आलेले नियम हे कारण आहे.
कोराना व्हायरसच्या संकटामुळे नवीन नियम झाले लागू-
कोरोना व्हायरसमुळे मार्चपासून ४ महिने ठप्प पडलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट जूलैमध्ये पुन्हा सुरु झाले. पण क्रिकेट पुन्हा सुरु होताना अनेक नवीन नियम आणि निर्बंध आयसीसीकडून घालण्यात आले. त्यातीलच एक म्हणजे सोशल डिस्टसिंग.
आयसीसीच्या नवीन नियमांनुसार मैदानावर खेळांडूंसह पंचानाही सोशल डिस्टसिंगचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे खेळाडू त्यांची कोणतीही गोष्ट म्हणजेच टोपी, चष्मा, स्वेटर, इ. मैदानावरील पंच किंवा संघसहकाऱ्यांकडे देऊ शकत नाही. पण गोलंदाजीवेळी किंवा इतरवेळी क्रिकेटपटू स्वत:च्या गोष्टी सांभाळू शकत नसल्याने ते संघातील खेळाडूची विशेषत: कर्णधाराची मदत घेत आहेत. म्हणजेच गोलंदाज गोलंदाजी करण्याआधी त्याची टोपी संघातील इतर खेळाडूकडे किंवा कर्णधाराकडे सोपवतो. त्यामुळे मैदानावर खेळाडू २ टोप्या घातलेले दिसून आले आहेत.
Just see this run out. Eoin Morgan is wearing two caps, probably Narain's on top of his own. Warner was doing the same the other day. Bowlers seemingly are not handing their caps in to the umpire.
Has anyone noticed with the other teams? pic.twitter.com/Y7RBF1zbrx— Joy Bhattacharjya (@joybhattacharj) September 23, 2020
Great to see our old friend Rahkeem #Cornwall still sporting the two caps look for @Zouksonfire in #CaribbeanPremierLeague pic.twitter.com/7IbA4Rs7FO
— Dr Alan Geere (@alangeere) August 27, 2020
हा नियम जूलैमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेपासून लागू करण्यात आला आहे. हाच नियम आयपीएलमध्येही लागू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई वि. मुंबई: दोन भावात आज होणार काट्याची टक्कर, लहानग्याने दिली मोठ्याला चेतावणी
ट्विटर वॉर!! धुव्वांदार विजयानंतर हैदराबादने राजस्थानला डिवचलं, ‘असा’ घेतला बिर्यानीचा बदला
“डिविलिअर्सचा गृहपाठ पूर्ण तर, ३ मुलं सापडली अडचणीत”, विराटला आठवले शाळेचे दिवस
ट्रेंडिंग लेख –
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!
-नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर