गुरुवारी (19 डिसेंबर) कोलकातामध्ये आयपीएल 2020 च्या (IPL2020)13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. पण या लिलावाआधी प्रत्येक संघांनी त्याचे काही खेळाडू मुक्त केले होते. तर काही खेळाडूंना संघात कायम केले होते. तसेच या दरम्यान काही खेळाडूंचे आपापसात ट्रेडिंगही करण्यात आले.
पण यासर्व गोष्टींमध्ये खेळाडूंना मुक्त करणे (Hard to Release Players) हे खूपच अवघड काम असल्याचे मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) मालक आकाश अंबानीने (Akash Ambani) म्हटले आहे.
कोणत्याही खेळाडूला मुक्त करणेे हे फ्रेंचायझी (संघ) मालकांसाठी सर्वात कठीण काम असते. एखाद्या विशिष्ट खेळाडूशी बरीच वर्षे जुळवून घेतल्यानंतर फ्रेंचायझीही क्रिकेटपटूंसोबत नातेसंबंध निर्माण करण्यास तयार असतात. परंतु, त्यांना लिलावात मुक्त करताना हे कठीण असते.
परंतु, शेवटी आयपीएल हा एक व्यवसाय आहे. ज्यामध्ये मोठी बोली लावली जाते. त्यामुळे संघमालकांना खेळाडूंना मुक्त करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, असे आकाश अंबानीने मान्य केले आहे.
गुरुवारी होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वी खेळाडूंना मुक्त करणे हे सर्वात कठीण काम होते, असे माध्यमांशी बोलताना अंबानीे म्हणाला.
या लिलावाआधी मुंबई इंडियन्सने 12 खेळाडूंना मुक्त केले असून 18 जणांना कायम केले होते. या खेळाडूंच्या उपस्थितीत मुंबईने मागील हंगामात आयपीएलमधील चौथ्यांदा विजेतेपद मिळवले होते.
मुक्त झालेल्या खेळाडूंमध्ये वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph), जेसन बेऱ्हेन्डाॅर्फ (Jason Behrendorff), ब्यूरेन हेंड्रिक्स (Beuran Hendricks) आणि अष्टपैलू क्रिकेटपटू बेन कटिंग (Ben Cutting) यांचा समावेश होता.
या लिलावात घेण्यात आलेल्या प्रमुख खेळाडूंमध्ये मुंबईने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर- नाईलला (Nathan Coulter- Nile) 8 कोटी रूपयांना तर ख्रिस लिनला (Chris Lynn) 2 कोटींमध्ये संघात समाविष्ट केले आहे.
गंभीर म्हणतो, हा गोलंदाज अजून तरी ८.५० कोटी रुपयांसाठी पात्र नाही
वाचा- 👉https://t.co/FZm2QHf4JI👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
…म्हणून सीएसकेने पीयूष चावलावर लावली ६.७५ कोटींची बोली, प्रशिक्षक फ्लेमिंगने केला खूलासा
वाचा- 👉https://t.co/aLM8daHCzz👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019