इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामाला यूएईतून प्रारंभ होणार आहे. आयपीएल २०२०चे साखळी सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. या हंगामातील पहिला सामना १९ सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अबुधाबी मध्ये रंगणार आहे.
मुंबईने मागीलवर्षी अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा इतिहास रचला होता. त्यांनी आत्तापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ असे ४ वेळा आयपीएल विजेतेपद मिळवले आहेत.
यावर्षी मुंबईच्या साखळी फेरीतील १३ सामन्यांपैकी ११ सामने रात्री ७.३० वाजता होतील. तर उर्वरित २ सामने दुपारी ३.३० वाजता सुरू होतील.
आयपीएलचा हा १३ वा मोसम यावर्षी ५३ दिवसांचा असणार आहे. १९ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत या आयपीएल मोसमातील साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होतील प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.
तसेच यावर्षी आयपीएलमध्ये १० डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.
असे आहेत आयपीएल २०२० मधील मुंबई इंडियन्सचे साखळी फेरीतील सामने –
१९ सप्टेंबर, शनिवार: मुंबई विरुद्ध चेन्नई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२३ सप्टेंबर, बुधवार: कोलकाता विरुद्ध मुंबई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२८ सप्टेंबर, सोमवार: बेंगलोर विरुद्ध मुंबई, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१ ऑक्टोबर: गुरुवार: पंजाब विरुद्ध मुंबई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
४ ऑक्टोबर: रविवार: मुंबई विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
६ ऑक्टोबर: मंगळवार: मुंबई विरुद्ध राजस्थान, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
११ ऑक्टोबर: शनिवार: मुंबई विरुद्ध दिल्ली, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१६ ऑक्टोबर: बुधवार: मुंबई विरुद्ध कोलकाता, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१८ ऑक्टोबर: शुक्रवार: मुंबई विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२५ ऑक्टोबर: सोमवार: राजस्थान विरुद्ध मुंबई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२८ ऑक्टोबर: सोमवार: मुंबई विरुद्ध बेंगलोर, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३१ ऑक्टोबर: शनिवार: दिल्ली विरुद्ध मुंबई, दुबई, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
३ नोव्हेंबर: मंगळवार: मुंबई विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
मुंबई इंडियन्स संघ –
आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, मिशेल मॅकक्लेनाघन, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, रोहित शर्मा, शेरफेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, नॅथन कॉल्टर-नाईल, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत रायसिंग, मोहसिन खान