गुरुवारी आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी चेन्नई येथे खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. या लिलावात २९२ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये इंग्लंडच्या डेविड मलानवर सर्वांचेच लक्ष होते. मलानने त्याच्या खेळाने मागील काही महिन्यात सर्वांनाच प्रभावित केले होते. तो आयसीसीच्या टी२० क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.
मात्र, या लिलावात त्याच्यासाठी फार मोठी चूरस पाहायला मिळाली नाही. त्याला १ कोटी ५० लाख रुपयांच्या मुळ किंमतीत पंजाब किंग्स संघाने खरेदी केले आहे. त्यामुळे तो या हंगामातून पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करेल.
मलानची कारकिर्द
मलानने त्याच्या कारकिर्दीत इंग्लंडकडून १५ कसोटी, १ वनडे आणि २३ टी२० सामने खेळले आहेत. त्याने खेळलेल्या १९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५३.४३ च्या सरासरीने ८५५ धावा केल्या आहेत, यात त्याने १ शतक आणि ९ अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने कारकिर्दीत एकूण २२३ ट्वेंटी-ट्वेटी क्रिकेटचे सामने खेळले आहेत. यात त्याने ५ शतके आणि ३५ अर्धशतकांसह ६११७ धावा केल्या आहेत.






