---Advertisement---

रब ने बना दी जोड़ी! प्रिती झिंटाच्या पंजाबने ५ कोटी २५ लाख मोजत शाहरुख खानला घेतले संघात

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 5:40 PM
---Advertisement---

चेन्नई। गुरुवारी (१८ फेब्रुवारी) पार पडलेल्या इंडियन् प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगांमाच्या लिलावात अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. अनेक संघांनी कोट्यावधींच्या बोली लावत काही स्टार खेळाडू आपल्या संघात दाखल करुन घेतले. या सर्वांमध्ये  तमिळनाडूकडून देशांतर्गत खेळणाऱ्या शाहरुख खाननेही सर्वांचे लक्ष वेधले.

२५ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू असलेल्या शाहरुख अनकॅप (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला खेळाडू) खेळाडू असल्याने त्याची या लिलावासाठी २० लाख ही मुळ किंमत होती. पण त्याच्यासाठी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात कोट्यावधी रुपयांची बोली लावण्याची स्पर्धा सुरु झाली. अखेर ५ कोटी २५ कोटी रुपयांची बोली लावत पंजाब किंग्सने त्याला आपल्या ताब्यात घेतले.

यावेळी पंजाबची सहसंघमालकीन असलेल्या प्रीती झिंटाने आम्ही शाहरुखला घेतले अशी गमतीशीर प्रतिक्रियाही दिली.

शाहरुख खानची क्रिकेट कारकिर्द
२५ वर्षीय शाहरुख तामिळनाडू संघाकडून क्रिकेट खेळला असून त्याने ५ प्रथम श्रेणी सामने, २० अ दर्जाचे सामने व ३१ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळले आहेत. शाहरुखने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २३१ धावा, अ दर्जाच्या सामन्यात २८६ धावा व ३ विकेट आणि ट्वेंटी ट्वेंटीमध्ये २९३ धावा व २ विकेट घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---