इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या यशस्वी आयोजनानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या स्पर्धेच्या 14 व्या हंगामाची तयारी करत आहे. मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एप्रिल ते मेच्या दरम्यान नवीन फ्रँचायझीसह आयपीएल हंगाम होण्याबाबत संकेत दिले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार या स्पर्धेच्या 14 व्या हंगामापुर्वी मेगा लिलाव होणार आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतर फ्रँचायझींना बहुतेक खेळाडू मुक्त करावे लागतील. यातून संघात मोठ्या प्रमाणात फेरबदल होऊ शकतात.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना प्रचंड चिंता आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि रशीद खान हे संघासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत आणि निश्चितच त्यांना संघात कायम ठेवले जाईल. तसेच मेगा-लिलावात संघाला केवळ दोन भारताबाहेरील खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी असल्याने चाहत्यांचा असा अंदाज आहे की, वर्षानुवर्षे हैदराबादसाठी उत्तम खेळ करणाऱ्या केन विलियम्सनला कदाचित संघ मुक्त करू शकतो.
‘विलियम्सनला गमावण्याची शक्यता आहे का ?’ असे थेट प्रश्न काही चाहत्यांनी वॉर्नरला विचारले. यावर हैदराबादच्या कर्णधाराने उत्तर दिले की, “आम्ही त्याला गमावणार नाही.”
न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विलियम्सन हैदराबादचे भविष्य असल्याचे सांगत त्याला संघात पुन्हा घेण्याची विनंती आणखी एका चाहत्याने वॉर्नरला केली आहे. या विनंतीला उत्तर देताना वॉर्नर म्हणाला, “आम्ही त्याला परत घेऊ. तुम्ही काळजी करू नका. आम्हाला आशा आहे की तो आम्हाला मिळेल आणि मलाही तो संघात हवा आहे ”
विलियमसन संघाचा एक भाग म्हणून रहावा अशी आपली इच्छा आहे, परंतु संघ व्यवस्थापन अंतिम निर्णय घेईल असेही त्याने स्पष्ट केले.
https://twitter.com/SteadyTheShip/status/1328631458672504833
Not good news for CSK fans. pic.twitter.com/TH5fHpI6wp
— Johns. (@CricCrazyJohns) November 14, 2020
जर मेगा लिलाव जुन्या नियमांनुसार होणार असेल तर फ्रेंचायझीकडे ‘राईट टू मॅच’ कार्डचा पर्याय असेल. ज्याद्वारे विलियम्सनला पुन्हा हैदराबाद संघात आणता येईल. जर बीसीसीआयने मेगा लिलावाला होकार दिला तर स्पर्धेइतकाच तोही रंजक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘स्मिथ, वॉर्नरच्या येण्याने ऑस्ट्रेलिया मजबूत तर भारतीय गोलंदाजी त्याहून भक्कम’
इरफान पठाणच्या आयपीएल २०२० संघातून विराट- रोहितला डच्चू, ‘या’ खेळाडूकडे सोपवले कर्णधारपद
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय खेळाडूंची अनोखी युक्ती, करतायेत टेनिस बॉलने सराव, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…






