---Advertisement---

आयपीएलवरही कोरोनाचे संकट; इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या या ६ खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर

Team-India
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रद्द करण्यात आला आहे. मालिकेदरम्यान भारताच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यानंतर आगामी आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.

मँचेस्टरमधील मालिकेतील शेवटच्या सामन्याआधी संघाचे फिजियो योगेश परमार कोरोना पाॅझिटिव्ह आढळले होते. त्यांच्या संपर्कात अनेक भारतीय खेळाडू आले असून बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझी सहा खेळाडूंवर नजर ठेवून आहेत. यामध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.

इनसाइड स्पर्ट्सच्या माहितीप्रमाणे, मोहम्मद सिराज त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्यानी विराट कोहलीसोबत लंडनमध्ये रवी शास्त्रींच्या पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसेच रोहित शर्मा त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्यानी सामना रद्द करण्यासाठी दुजोरा दिला होता. रोहितच्या हॅमस्ट्रिंगचा उपचारही परमारच करत होते. त्यामुळे रोहितवर नजर ठेवली जाणार आहे.

बीसीसीआयनेही या खेळाडूंना सावध राहण्यासाठी सांगितले आहे आणि हाॅटेल रूममधून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. निगराणीखाली असलेल्या खेळाडूंपैकी कोणी एखादा जरी खेळाडू कोरोना संक्रमित आढळला, तरी आयपीएलवरही याचा परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामने सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. आयपीएल संघांशी संबंधित एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, “आम्ही याच्यावर बीसीसीआयेच्या दिशा निर्देशांकांची वाट पाहणार आहोत. आम्ही फक्त हीच आशा करत आहोत की, सर्व खेळाडू सुरक्षित आणि सखरूप पोहोचायला हवेत. जर कोणी कोरोना पाॅझिटिव्ह आढळले तर त्याचा स्पर्धेवर परिणाम पडू शकतो. पण सर्वांना लसीकरण झालेले आहे आणि कसलीही अडचण येणार नाही.”

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला काय करावे लागेल? स्टीव स्मिथ म्हणाला…

सर्वात मोठा इतिहास रचण्यापासून जोकोविच केवळ एक पाऊल दूर, फायनलमध्ये मेदवेदेवशी होणार टक्कर

‘मला टी२० विश्वचषकात खेळवण्याचा शब्द दिला होता, आता संपर्कही साधला नाही’, ताहिरचा आरोप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---