---Advertisement---

कौतुकाची थाप तर बनतेच! संंघाचं सोडा, धुंवाधार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा चेन्नईकडून सत्कार, हे पाहा फोटो

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 8:54 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला शुक्रवारी(९ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने सुरुवात होणार आहे. या सामन्यानंतर १० एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या हंगामाला सुरुवात होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सने आपल्याच संघात एक छोटा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.

या पुरस्कार सोहळ्यात त्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला, ज्यांनी मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्ससाठी खास कामगिरी केली होती. याबद्दल चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

चेन्नईने फाफ डू प्लेसिसला मागील हंगामात चेन्नईकडून सर्वाधिक धावा केल्याबद्दल, सॅम करनला सर्वाधिक विकेट्स घेतल्याबद्दल सन्मानित केले आहे. डू प्लेसिसने युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२० हंगामात १३ सामन्यांत ४४९ धावा केल्या होत्या. तर करनने १४ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या होत्या. डू प्लेसिसला त्याच्या कामगिरीबद्दल चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि सुरेश रैना यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली. तर करनला धोनी आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली.

पुण्याच्या ऋतुराज गायकवाडचाही सन्मान
ऋतुराज गेल्या ३ हंगामापासून चेन्नई संघाचा भाग आहे. त्याने गेल्या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याच्यासाठी मागील हंगामाची सुरुवात खास झाली नव्हती. मात्र त्याने हंगामाचा शेवट अफलातून कामगिरी करत गोड केला होता. ऋतुराज मागील आयपीएल हंगामाच्या सुरुवातीच्या काही दिवसातच दोनवेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला अन्य खेळाडूंपेक्षा अधिक काळ क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते. ज्यामुळे तो आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर संघाशी जोडला गेला होता. तसेच त्याची सुरुवातीची कामगिरीही विशेष झाली नाही.

पण नंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने चेन्नईकडून शेवटच्या तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सलग ३ अर्धशतके करणारा चेन्नईचा पहिला खेळाडू ठरला. त्याने चेन्नईकडून ६ सामने खेळताना ५१ च्या सरासरीने २०४ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीबद्दलही चेन्नई सुपर किंग्सने त्याचा गौरव केला आहे.

त्याचबरोबर अंबाती रायडूने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १५० पेक्षा अधिक सामने आणि ३५०० पेक्षा अधिक धावा केल्याबद्दल त्याचाही गौरव करण्यात आला.

चेन्नईला यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा –
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएलच्या १३ व्या हंगामात खुपच निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यांना १४ सामन्यांमधील केवळ ६ विजयांसह गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. त्यामुळे यंदा मात्र चेन्नईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“सिंहासारख्या दृढ निश्चयाने करेल पुनरागमन”, श्रेयस अय्यरने शस्त्रक्रियनंतर दिली प्रतिक्रिया

आनंदाची बातमी! ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमधून परतला घरी; लिहिला ‘हा’ खास संदेश

धोनी १४ व्या हंगामानंतर घेणार आयपीएलमधून निवृत्ती? चेन्नईच्या बड्या अधिकाऱ्याने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---