आजपासून (०९ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा महासंग्राम सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने या हंगामाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांची लढत होणार आहे. तत्पुर्वी चेन्नईचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड याने या हंगामातून माघार घेतल्याने संघाची चिंता वाढली होती.
मात्र नुकतेच चेन्नईने हेजलवुडचा पर्यायी खेळाडू म्हणून जेसन बेहरेनडॉर्फ याला आपल्या ताफ्यात दाखल केले आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन याने यापुर्वी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. परंतु त्याला पूर्ण हंगामात केवळ ५ सामने खेळायची संधी मिळाली होती. दरम्यान त्याने १६५ धावा देत अवघ्या ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीला पाहता मुंबईने त्याला आयपीएल २०२० मध्ये संघातून मुक्त केले होते. मात्र त्याला गतवर्षी कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता.
NEWS: @ChennaiIPL sign Jason Behrendorff as replacement for Josh Hazlewood. @Vivo_India #VIVOIPL
More details 👉 https://t.co/XIZSzQZqSb pic.twitter.com/8lRptsIv5c
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2021
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे घेतली माघार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाला पाहता ३० वर्षीय हेजलवुडने यंदाच्या आयपीएल हंगाम कालावधीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलताना हेजलवुडने सांगितले होते की, “मागील १० महिन्यांपासून मी वेगवेगळ्या वेळी जैव सुरक्षित वातावरण आणि विलगीकरणात राहिलो आहे. त्यामुळे मी क्रिकेटमधून थोडा वेळ सुट्टी घेण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन मी माझ्या मायदेशी आणि माझ्या घरी काही वेळ घालवू शकेन. पुढील हिवाळी हंगाम आमच्यासाठी खूप मोठा असणार आहे.”
“ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज दौरा खूप मोठा असेल. बांगलादेशविरुद्धची टी२० मालिका वर्षाच्या शेवटच्या महिन्यात होईल. त्यानंतर टी२० विश्वचषक २०२१ आणि मग ऍशेस सीरिज. अशाप्रकारे पुढील १२ महिने खूप महत्त्वाचे असणार आहेत. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असताना मला मानसिक आणि शारिरिक रित्या स्वत:ला पूर्णपणे तयार ठेवायचे आहे. याच कारणामुळे मी आयपीएलचा यंदाचा हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याचा पुढे मलाच फायदा होणार आहे,” असे त्याने पुढे सांगितले होते.
गतवर्षी तो चेन्नई संघाचा भाग होता. मात्र पूर्ण हंगामात त्याला अवघ्या ३ सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली होती. दरम्यान त्याने ६४ धावा खर्च करत केवळ १ विकेट घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
अरे व्वा! केवळ हिंदी, मराठी नव्हे तर ‘या’ ८ भाषांमध्ये ऐकायला मिळणार आयपीएल सामन्यांचा थरार
मी सराव करुन परतलो आणि वडीलांचे निधन झाल्याचे कळाले; सिराजचा दु:खद आठवणींना उजाळा