---Advertisement---

चेन्नई टू मुंबई! थालाची सीएसके महाराष्ट्राच्या राजधानीत, रैनाचेही मुंबईत आगमन

On: शुक्रवार, मार्च 26, 2021 12:05 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १४ व्या हंगामाची सुरूवात होण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक रहिला आहे. 9 एप्रिल रोजी आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने होणार आहे. तसेच दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 10 एप्रिल रोजी होणार आहे. या हंगामासाठी चेन्नईचा संघ मुंबईला रवाना झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्सचे सराव शिबिर चेन्नईमध्ये सुरु होते. आता या सराव शिबिरानंतर चेन्नईचा संघ खास बसने मुंबईकडे रवाना झाला आहे.

चेन्नईची आयपीएल २०२१ ची सुरुवात मुंबईतून

खरंतर यंदा कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएलचे आयोजन वेगळ्या प्रकारे करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळा प्रवास करणार आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कमी होईल. तसेच कोणताही संघ आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.

त्यामुळे यंदा चेन्नई संघाचे पहिले ५ सामने मुंबईत होणार आहेत. त्यानंतर चेन्नई साखळी फेरीतील पुढील सामने दिल्ली, बंगळुरु आणि कोलकाता येथे खेळणार आहे.

Photo Courtesy: Instagram/Chennai Super Kings

रैनादेखील चेन्नई संघात सामील

मागील हंगामात सुरेश रैनाने आयपीएलच्या १४ व्या हंगामातून माघार घेतली होती. त्याने मागील हंगामासाठी दुबई गाठल्यानंतर वैयक्तिक कारणे सांगून अचानक त्याने आपले नाव मागे घेतले होते. रैना दुबईहून परत आल्यानंतरही बरीच खळबळ उडाली होती. त्यामुळे असे म्हटले जात होते की, यावर्षी सीएसके कदाचित त्याला सोडन देईल. परंतु, चेन्नईने त्याच्यावर विश्वास कायम ठेवत संघातही कामय केले.

आता त्याने या हंगामासाठी मुंबई गाठली आहे. तो ६ दिवसांच्या क्वारंटाईननंतर चेन्नई संघाबरोबर सराव करण्यास सक्षम असेल. सीएसकेने त्याच्या सघांचे प्रशिक्षण शिबिर उर्वरित संघांपेक्षा थोडसं लवकर सुरू केले होते. कर्णधार महेंद्रसिंग धोनी 4 मार्च रोजीच चेन्नईला पोहोचला होता.

Photo Courtesy: Instagram/Suresh Raina

सीएसकेने १० मार्चच्या जवळपास प्रशिक्षण शिबीर सुरू केले. मागील हंगाम हे सीएसकेसाठी चांगले ठरले नव्हते. चेन्नईला पहिल्यांदाच प्ले ऑफमध्येही पोहोचता आले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या –

INDvENG: भारताला विजयी आघाडी घेण्याची संधी, तर इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, दुसऱ्या वनडेबद्दल जाणून घ्या सर्वकाही

ब्रेकिंग! इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची उर्वरित वनडे मालिकेतून माघार, ‘या’ खेळाडूच्या हाती नेतृत्त्वपद

चेन्नई संघासाठी आनंदाची बातमी! जडेजा शस्त्रक्रियेनंतर मैदान गाजवण्यास सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---