---Advertisement---

पहिल्याच षटकात ६ चौकार मारणाऱ्या पृथ्वी शॉचे सामन्यानंतर शिवम मावीने धरले मानगूट, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, एप्रिल 30, 2021 1:01 AM
---Advertisement---

अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २५ सामने गुरुवारी (२९ एप्रिल) पूर्ण झाले. आत्तापर्यंत या हंगामात अनेक रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. पण याबरोबरच मैदानात जरी जंगी लढती होत असल्या तरी सामन्यांनतर खेळाडूंमध्ये असलेली मैत्रीही पाहायला मिळाली आहे. नुकतीच अशीच एक घटना गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०२१च्या २५ वा सामन्यात पाहायला मिळाली.

मैदानातील लढतीनंतर पृथ्वी शॉ-शिवम मावीची मस्ती. 
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सलामीवीरांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात पृथ्वी शॉने आक्रमक अर्धशतक करताना मोलाचा वाटा उचलला. त्याने त्याच्या या खेळी दरम्यान दिल्लीच्या डावाच्या पहिल्याच डावात ६ चौकार ठोकले. हे षटक कोलकाताकडून शिवम मावी टाकत होता. त्यामुळे या षटकात शिवम मावीने एका वाईड चेंडूसह एकूण २५ धावा दिल्या.

शॉ आणि मावीमध्ये सामन्यादरम्यान जरी कडवी झुंज पाहायला मिळाली असली, तरी सामन्यानंतर मात्र, हे दोघेही एकमेकांशी मस्ती करतानाही दिसले. त्यांच्या या मस्तीचा व्हिडिओ आयपीएलच्या ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मावीने त्याच्याविरुद्ध ६ चौकार मारल्याबद्दल सामन्यानंतर शॉच्या मानेला पकडत त्याला गमतीने मारण्याचा प्रयत्नही केला. यावरुन या दोन खेळाडूंमध्ये असलेली चांगली मैत्री दिसून आली. कारण जरी मावीने शॉचे मानगुट पकडले तरी ते गमतीने होते, हे व्हिडिओत स्पष्टपणे दिसते.

https://twitter.com/IPL/status/1387822857556828163

शॉ आणि मावी खेळलेत एकत्र
शॉ आणि मावी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मावीने शॉच्या नेतृत्वाखाली २०१८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो विश्वचषक जिंकण्यात त्याने मोलाचा वाटा देखील उचलला होता. त्याने ६ सामन्यात १८.८८ च्या सरासरीने ९ विकेट्स घेतल्या होत्या.

मला माहित होते मावी कुठे गोलंदाजी करणार – शॉ
या सामन्यानंतर मावीविरुद्ध पहिल्या षटकात मारलेल्या ६ चौकारांबद्दल शॉ म्हणाला, ‘आम्ही आता ४-५ वर्षे खेळलेलो आहे. त्यामुळे मला माहित होते, तो मला कुठे चेंडू टाकणार आहे. त्यामुळे मी तयारीत होतो.’

दिल्लीचा विजय
शॉने १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनबरोबर शतकी भागीदारीही रचली. या दोघांनी सलामीला खेळताना १३२ धावांची भागीदारी केली. शिखर ४६ धावांवर बाद झाला. तर शॉ ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांवर बाद झाला. या दोघांच्या दमदार भागीदारीने दिल्लीचा विजय सोपा केला. दिल्लीने पुढे १६.३ षटकात १५६ धावा करत विजय निश्चित केला.

महत्त्वाच्या बातम्या –

पृथ्वी शॉच्या पहिल्याच षटकातील ६ चौकारांमुळे शिवम मावीच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम

पृथ्वी शॉचा मोठा कारनामा! केवळ १८ चेंडूत अर्धशतक झळकावत केला ‘हा’ रेकॉर्ड

Video: ‘शॉ’ची दमदार कामगिरी! आख्ख्या ‘पृथ्वी’वर एकच चर्चा; आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असं’ घडलंय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---