---Advertisement---

पृथ्वी शॉच्या पहिल्याच षटकातील ६ चौकारांमुळे शिवम मावीच्या नावावर झाला ‘हा’ नकोसा विक्रम

On: शुक्रवार, एप्रिल 30, 2021 12:31 AM
Shivam-Mavi
---Advertisement---

अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ विकेट्सने पराभव केला. दिल्लीच्या या विजयात सलामीवीर पृथ्वी शॉने खास विक्रम केला. मात्र, त्याच्य़ा ताबडतोड फलंदाजीमुळे कोलकाताचा गोलंदाज शिवम मावीच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.

पृथ्वी शॉची ताबडतोड फलंदाजी, तर मावीचा नकोसा विक्रम
कोलकाताने या सामन्यात दिल्लीला विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना शॉने ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने दिल्लीच्या डावाच्या पहिल्याच डावात ६ चौकार ठोकले.

झाले असे की कोलकाताकडून हे षटक शिवम मावी टाकत होता. त्याने पहिलाच चेंडू वाईड टाकला. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकावा लागला. त्यावर शॉने खणखणीत चौकार मारला. या फटक्याबरोबरच शॉचा वेगळाच इरादा दिसला. त्याने या षटकातील पुढील ५ चेंडूंवर देखील चौकार लगावले. त्यामुळे पहिल्या षटकात एकूण २५ धावा निघाल्या.

याचमुळे शिवम मावी आयपीएलमध्ये सामन्याच्या एका डावातील पहिल्या षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला. त्याने यादीत वरुण ऍरॉनला मागे टाकले. वरुणने २०१९ सालच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पहिल्या षटकात २३ धावा दिल्या होत्या.

या यादीत अव्वल क्रमांकावर अबू नेचिम आहे. त्याने २०११ आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना बेंगलोरविरुद्ध पहिल्या षटकात २७ धावा दिल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर फिरकीपटू हरभजन सिंग आहे. त्याने २०१३ आयपीएल हंगामात मुंबईकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पहिल्याच षटकात २६ धावा दिल्या होत्या.

अजिंक्य रहाणेनंतर शॉचा कारनामा
आयपीएलमध्ये एका षटकात ६ चौकार मारण्याचा विक्रम सर्वप्रथम अजिंक्य रहाणेने केला होता. त्याने २०१२ आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध एका षटकात सलग ६ चौकार मारण्याचा कारनामा केला होता. त्याच्यानंतर असा विक्रम आता शॉने केला आहे.

दिल्लीचा विजय
गुरुवारी शॉने १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनबरोबर शतकी भागीदारीही रचली. या दोघांनी सलामीला खेळताना १३२ धावांची भागीदारी केली. शिखर ४६ धावांवर बाद झाला. या दोघांच्या दमदार भागीदारीने दिल्लीचा विजय सोपा केला. दिल्लीने पुढे १६.३ षटकात १५६ धावा करत विजय निश्चित केला.

महत्त्वाच्या बातम्या –

पृथ्वी शॉचा मोठा कारनामा! केवळ १८ चेंडूत अर्धशतक झळकावत केला ‘हा’ रेकॉर्ड

Video: ‘शॉ’ची दमदार कामगिरी! आख्ख्या ‘पृथ्वी’वर एकच चर्चा; आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असं’ घडलंय

DCvsKKR : पृथ्वी शॉच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा कोलकाताला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---