आयपीएल 2021 मधील 13 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यामध्ये 13 षटकानंतर चेंडू ओला झाल्यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दुसरा चेंडू मागवला. त्यामुळे या सामन्यात समलोचन करत असलेले माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी या मुद्द्यावर बोट ठेवून संघांमध्ये भेदभाव होत असल्याचे सांगितले आहे.
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दोन दिवसापुर्वी आयपीएल २०२१ चा अकरावा सामना झाला होता. या सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार केएळ राहुलने सांगितले होते की, “जेव्हाही आम्ही वानखेडे स्टेडियममध्ये खेळतो, तेव्हा दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे थोडे कठीण जाते. आम्ही याच स्थितीसाठी तयारी केली होती. परंतु बऱ्याचदा गोलंदाज ओल्या चेंडूने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. पण असे नेहमीच करणे कठीण असते. मी तर अंपायरला सामन्यादरम्यान म्हटले होते की, चेंडू बदलून द्या. परंतु हे नियमांमध्ये बसत नसल्याने त्यांनी माझे एक ऐकले नाही.”
यावर बोलताना इरफान पठाण यांनी म्हटले की, “इतर संघावर हा एकप्रकारे अन्याय झाला आहे, कारण पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलनेदेखील चेंडू ओला झाल्यामुळे दुसरा चेंडू द्यावा अशी पंचांना मागणी केली होती. परंतु पंचांनी त्याची मागणी पुर्ण केली नाही.”
यावेळी निखिल चोपडा देखील याठिकाणी हजर होते. त्यांनीही पठाण यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य असल्याचे सांगत सर्व संघांसाठी नियम समान असावेत असे म्हटले आहे.
तसेच आयपीएल 2021 च्या 12 व्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यातही धोनीच्या सीएसके संघाला चेंडू बदलू दिला होता. हा चेंडू षटकारासाठी गेल्यामुळे तो परत आला नाही. त्यामुळे सीएसकेला नवीन चेंडू देण्यात आला आणि हा नवीन चेंडू भेटल्यानंतर मोईन अली आणि रविंद्र जडेजाने राजस्थानच्या संघातील खेळाडूंना पटापट बाद करून सामना जिंकला. या घटनेचा समावेशही इरफान पठान यांनी आपल्या संभाषणात केला.
महत्वाच्या बातम्या-
मिश्राजींपुढे मुंबईचे लोटांगण, भल्याभल्या फलंदाजांच्या ‘अशा’ चटकावतो विकेट्स; स्वत:च केला उलगडा