आयपीएलचा १४ वा हंगाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अर्ध्यातून थांबवावा लागला होता. याच हंगामाचे उर्वरित सामने आता १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहेत. उर्वरीत सामन्यांतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ नुकतेच यूएईमध्ये दाखल झाले आहेत. याआधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने अचानक यूएईमधून फोटो शेअर करून सर्वांना चकीत केले होते.
श्रेयस दिल्ली कॅपिटल्स संघाच्या आधीच यूएईत दाखला झाला आहे. त्याने यूएई सरावालाही सुरूवात केली आहे. तो पहिला खेळाडू ठरला आहे, ज्याने या हंगामात यूएईत सरावाला सुरूवात केली आहे.
दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलच्या १३ व्या हंगामात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणारा कर्णधार श्रेयसला १४ व्या हंगामात दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर जावे लागले होते. या हंगामातील पहिला टप्पा पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाचे संक्रमन झाल्यामुळे अर्ध्यातूनच हंगाम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित सामने आता यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. त्याआधी एनसीएने श्रेयसला फिट घोषित केले आहे.
त्यामुळे क्रिकेटपासून बरेच महिने दूर राहिलेला श्रेयस दिल्ली कॅपिटल्स संघाच्या आधी यूएईत पोहोचला आहे आणि त्याने तेथे मैदानात सरावाला सुरूवातही केली आहे.
https://twitter.com/Bewareofksgian/status/1427677069857546241?s=20
तो यूएईत दुबईच्या आयसीसी क्रिकेट अकादमीच्या स्टेडियमवर सराव करत आहे. सध्या एकटा असल्यामुळे तो तेथे स्थानिक संघासोबत सराव करताना दिसला आहे. आयपीएल २०२१ च्या भारतात आयोजित केलेल्या सामन्यांतून दुखापतीमुळे बाहेर झाल्यावर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रिषभ पंतवर आली होती. संघाने रिषभ पंतच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली. संघ १२ गुणांसह आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. रिषभ पंतने केलेल्या संघाच्या चांगल्या नेतृत्वामुळे संघाच्या कर्णधारपदाचा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे निर्माण होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडमधील टीम इंडियाच्या मागील तिन्ही विजयाचे ‘अँडरसन कनेक्शन’, वाचा सविस्तर
लॉर्ड्स कसोटी गमावली परंतु, जो रूटने भारताला नडणाऱ्या ‘त्या’ दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान