---Advertisement---

हैदराबादविरुद्ध विजयानंतर दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाला…

On: सोमवार, ऑक्टोबर 4, 2021 2:11 PM
dk
---Advertisement---

 

आयपीएलच्या मैदानात रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हंगामातील ४९ वा सामना पार पडला. या सामन्यात केकेआरने सहा विकेट्सने विजय मिळवला. हा सामना अंतिम षटकापर्यंत खेळला गेला. सामन्याचा शेवट करण्यामध्ये दिनेश कार्तिकने महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने केकेआरसाठी नाबाद १८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर त्याने काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला.

हे आव्हान सोपे नव्हते

सामन्यानंतर बोलताना दिनेश कार्तिकने सांगितले की, “मला वाटते की, हा प्रत्यक्षात क्रिकेटचा चांगला खेळ झाला. मध्यांतरलाच मला माहित होते की, हे आव्हान सोपे राहणार नाही. कारण, खेळपट्टी अवघड होती. जेव्हा मी समालोचन करत होतो तेव्हा मी खूप अभ्यास करत होतो. येथे मी भाग्यशाली राहिलो. हा असा सामना नव्हता, जेथे तुम्ही सामना अखेरपर्यंत मी येऊ शकत नाही. तुम्ही खेळपट्टीचा उपयोग करून संधी निर्माण करून, आपले फटके खेळू शकता.”

दिनेश कार्तिकने पुढे सांगितले की, “तुम्ही लवचीक असण्याची गरज आहे. मी नितीश राणाला खूप श्रेय देईल. त्याने शुबमन खेळत असताना संयम दाखवला. जम बसल्यावर त्याने दोन मोठे फटके मारून सामना आपल्या बाजूने केला.”

या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादने घेतलेला हा निर्णय केकेआरच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. हैदराबाद संघाला निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावून केवळ ११५ धावा बनविता आल्या. प्रत्युत्तरात, केकेआरने १९.४ षटकांमध्ये ११९ धावा केल्या आणि सामना जिंकला. केकेआरच्या शुबमन गिलने ५१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. तोच या सामन्याचा मानकरी ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---