आयपीएलचा तेरावा हंगामा 2020 मध्ये यूएईत पार पडला होता. या हंगामात ग्लेन मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र हा ऑस्ट्रेलिया संघाचा स्फोटक खेळाडू या हंगामात पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्यामुळे यंदा होणार्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी होणार्या लिलावापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ग्लेन मॅक्सवेलला आपल्या संघातून डच्चू दिला आहे. त्याने तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना एकही षटकार ठोकला नव्हता.
ऑस्ट्रेलिया संघाचा स्फोटक खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला मागील हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने खरेदी केले होते. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला अपेक्षा होती की, ग्लेन मॅक्सवेल आपल्या संघात आल्याने संघाचे मनोबल वाढेल. ग्लेन मॅक्सवेल आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शतक ठोकले होते. मात्र त्यानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना, तो पूर्णपणे अपयशी ठरला.
त्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने 14 सामन्यात 108 धावा केल्या होत्या. त्याने यामध्ये 9 चौकार ठोकले होते. मात्र त्याला यामध्ये एक ही षटकार ठोकता आला नव्हता.
"The plan was to retain the core" – Head Coach @anilkumble1074 on the players retained, released and more… 🗣#IPL2021 #SaddaPunjab pic.twitter.com/1dGj79pum9
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 20, 2021
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने रिलीज केलेल खेळाडू :
ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉटरेल, कृष्णाप्पा गौतम, मुजीब उर रहमान, जिमी निशम, करून नायर, जगदीश सुचित, तजींदर सिंग, हारदुस विलोजेन.
त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने मागील पाच वर्षात प्रथमच आपल्या संघाच्या प्रशिक्षकाला रिटेन केले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने अनिल कुंबळे यांना संघाचे प्रशिक्षक म्हणून आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी कायम ठेवले आहे. त्याचबरोबर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने संघाने 25 खेळाडूंच्या ताफ्यातील 16 खेळाडूंना आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी रिटेन केले आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी रिटेन केलेले खेळाडू :
केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अगरवाला, निकोलस पूरनन, मनदीप सिंग, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नळकांडे, रवि बिष्णोई, मुरुगुन आश्विन, अरशदीप सिंग, इशान पोरेल, हरप्रीत ब्रार.
महत्वाच्या बातम्या:
म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा
आयपीएल २०२१ : जाणून घ्या कोणत्या संघाने किती खेळाडूंना केले मुक्त आणि कोणत्या खेळाडूंना केले कायम
BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय