आयपीएल २०२१ चा हंगाम अर्ध्यात स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. उर्वरित सामन्यांमधील पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. राहिलेल्या हंगामासाठी आयपीएलचे संघ यूएईमध्ये दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही मैदानाव सराव करताना दिसत आहे.
तो मागच्या काही काळापासून कंबरेच्या दुखापतीमुळे खराब फार्ममध्ये आहे. भारतीय संघाच्या नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही त्याला काही खास प्रदर्शन करता आले नव्हते. अशात मुंबई इंडियन्सने ट्विटरवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हार्दिक जोरदार फटकेबाजी करताना दिसतो आहे.
यावरुन मागच्या काही काळापासून कंबरेच्या दुखण्याने त्रस्त असलेला हार्दिक आयपीएलसाठी फिट झाला असल्याचे दिसत आहे. व्हिडिओत हार्दिक त्याच्या आवडीचा हेलिकाॅप्टर शाॅट मारताना दिसत आहे. अगदी मुंबई इंडियन्सची जर्सी घालून तो सराव करतो आहे. यावेळी त्याने एका चेंडूला जोराने भिरकावून सीमारेषेबाहेर पाठवले आहे.
𝐉𝐮𝐬𝐭 𝐖🤩𝐖 🚁#OneFamily #MumbaiIndians #KhelTakaTak #IPL2021 @hardikpandya7 @MXTakaTak MI TV pic.twitter.com/QY2gLs7GY2
— Mumbai Indians (@mipaltan) September 8, 2021
आयपीएलच्या नेमके तोंडावर असताना हार्दिक त्याच्या फॉर्ममध्ये परतत असून मुंबईच्या चाहत्यांसाठी ही चांगली बातमी आहे. नुकत्याच झालेल्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर तो भारतीय संघाचा महत्वाचा भाग होता. पण त्याला या दौऱ्यात काही विशेष कामगिरी करता आली नाही. मागच्या बऱ्याच काळापासून चाहत्यांना त्याचे हे रूप पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीला पडला आहे.
हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या संघासोबत यूएईमध्ये आले नव्हते. ते दोघे संघ यूएईत पोहचल्यानंतर काही दिवसांनी यूएईमध्ये दाखल झाले होतो आणि आता ते त्यांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून संघासोबत सहभागी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतरही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ २ बदलांंची आवश्यकता
‘गोल्डन बॉय’चा भाव वाढला! ब्रँड व्हॅल्यूमध्ये नीरजने रोहित-राहुलला सोडले मागे, आता कोहलीवर नजर
तूच रे तूच! पाण्याची बाटली पायाजवळ पडलेली असूनही रूटचं दुर्लक्ष, पण कोहलीने जिंकली कोट्यावधी मने