---Advertisement---

दुबईच्या आलिशान हॉटेलमध्ये थांबलाय सीएसके संघ, एका दिवसाचे भाडे ऐकून उडेल तुमची झोप!

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 11:10 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) म्हटले की तामझाम, पैसा, प्रसिद्धी हे सगळे ओघाने आलेच. यात कुठलीही तडजोड होणे नाही. अगदी या जागतिक महामारीच्या परिस्थितीतही यात फारसा फरक पडलेला नाही. आयपीएल 2021 साठी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) संघ यूएईला पोहोचला आहे. सीएसकेचा संघ आपल्या खेळाडूंसह यूएईतील दुबई येथे थांबला आहे, जिथे ते ‘टीएच 8 पाम हॉटेल’मध्ये थांबले आहेत.

आयपीएलची दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेला सीएसके संघ शुक्रवारी (13 ऑगस्ट) दुबईत दाखल झाला आहे. दरम्यान, सीएसकेने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात कॅप्टनकूल संघाच्या हॉटेलमध्ये पूल खेळ खेळतांना दिसतोय. या आलिशान हॉटेलमध्ये सीएसके संघासाठी स्वतंत्र इमारत राखीव आहे. हा भाग सीएसकेच्या, पिवळ्या रंगामध्ये रंगवण्यात आला आहे.

सीएसके संघाचा कर्णधार धोनीची पत्नी साक्षीने हॉटेलच्या खोलीतून रात्रीचे दृश्य शेअर केले आहे. फोटोमधील दृश्य नेत्रदीपक आहे. सीएसकेचा खेळाडू सुरेश रैनानेही हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर फोटो शेअर केला आहे. या हॉटेलच्या सर्व खोल्यांमध्ये स्वयंपाकघर जोडलेले आहेत. प्रत्येक छोट्या-मोठ्या सुविधा हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. हॉटेलच्या बाहेर संघाच्या खेळाडूंसाठी खुले क्षेत्र आहे, जेथे खेळाडू बाहेर बसून गप्पा गोष्टी अगदी पार्टीही करू शकतात.

https://www.instagram.com/p/CShd7DBhxH7/?utm_source=ig_web_button_share_sheet

सीएसके संघ दुंबईत जेथे राहतो आहे, त्या आलिशान हॉटेलच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर, खोलींच्या प्रत्येक दिवसाचे भाडे 30 हजारपेक्षा जास्त आहे.

सीएसकेची नजर चौथ्या जेतेपदावर
धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसके संघाने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात 7 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. अशाप्रकारे 10 गुणांची कमाई करत सीएसके संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित हंगामातही हीच लय कायम राखत चौथ्यांदा चषक जिंकण्याचा सीएसके संघाचा इरादा असणार आहे. त्यांनी आतापर्यंत 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएल जेतेपद पटकावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

यंदा आयपीएलप्रेमींची संपणार प्रतिक्षा, युएई सरकारचा प्रेक्षकांच्या उपस्थितीस हिरवा कंदील

युएईत आयपीएल खेळण्यास पाँटिंगचे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना समर्थन, उद्देश आहे खूप मोठा

नुकताच साखरपुडा झालेल्या श्रेयसच्या होणाऱ्या पत्नीचे राहुलशी आहे ‘हे’ नाते, पार्टींमध्ये होत असते भेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---