भारतीय क्रिकेट (Indian Cricket) पुन्हा एकदा वादाच्या काळातून जात आहे. विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद (Virat Kohli Removed As ODI Captain) काढून घेण्यात आले आहे. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेतून ब्रेक घेतला आहे, असे वृत्त समोर येतेय. दुसरीकडे, दुखापतग्रस्त रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. ज्यामध्ये तो विराटच्या नेतृत्वाखाली खेळणार होता. अशा स्थितीत बीसीसीआयसमोर अडचणी वाढत आहेत. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कोहलीच्या हातून कर्णधारपद हिसकावून घेण्याचे कारण आयपीएल असल्याचे वृत्त समोर येत आहे.
बीसीसीआयच्या सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, “२०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळातही बीसीसीआयला आयपीएल व्हावे असे वाटत होते. बीसीसीआय आयपीएल रद्द करण्याचा विचार करत नव्हती. ३ मे रोजी विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची कोलकाता नाईट रायडर्सशी गाठ पडणार होती. कोलकाता संघातील दोन सदस्य वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर कोविड पॉझिटिव्ह आढळलेले. यानंतर, विराटने केकेआरसोबत सामना खेळण्यास स्पष्ट नकार दिला. विराटने नकार देण्यापूर्वी कोणताही संघ कोरोनाबद्दल बोलत नव्हता. मात्र, बेंगलोर आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर इतर फ्रँचायझींनीही त्यांच्या खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या तब्येतीची चिंता व्यक्त केली आणि सामने खेळण्यास नकार दिला. कोलकाता संघ २९ एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये दिल्ली विरुद्ध सामना खेळला होता. संदीप वॉरियर आणि वरुण प्लेइंग इलेव्हनमध्ये नसले तरी ते संघात होते, त्यामुळे चिंता आणखी वाढलेली. (IPL 2021)
तीन मे रोजी होणारा बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना फ्रँचायझींच्या विरोधामुळे पुढे ढकलण्यात आला. यानंतर ४ मे रोजी बोर्डाने संपूर्ण आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सूत्रानुसार, विराटने नकार दिल्याने बोर्ड संतापले होते.
आयपीएल पुढे ढकलल्याने नुकसान होईल, अशी भीती बोर्डाला वाटत होती. मात्र, विराटने त्याकडे दुर्लक्ष केलेले. यानंतर, आयपीएल २०३१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळले गेले. एवढेच नाही तर भारतात होणारा टी२० विश्वचषकही होऊ शकला नाही. हा विश्वचषकदेखील यूएईमध्येच आयोजित करावा लागला. (T20 World Cup)
आयपीएल आणि टी२० वर्ल्डकपमध्ये बीसीसीआयचे नुकसान झाले. या सगळ्याशिवाय विराटच्या आणखी एका निर्णयाने बोर्ड नाराज झालेले. विराटने १६ सप्टेंबरला टी३० विश्वचषकापूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पत्र लिहून टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केला. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराटच कर्णधार असावा अशी इच्छा व्यक्त केलेली. तरीही कोहलीने राजीनामा दिला. यानंतर कोहलीला वनडे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. (Virat Kohli Resign As T20 Captain)
महत्त्वाच्या बातम्या-
विजय हजारे ट्रॉफीतही ऋतु’राज’! पाचव्या सामन्यात झळकवले चौथे शतक; महाराष्ट्राचा विजयरथ सुसाट
ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’