---Advertisement---

बटलर राजस्थान संघातून बाहेर; न्यूझीलंडच्या ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळाली बदली खेळाडू म्हणून संधी

On: रविवार, ऑगस्ट 22, 2021 12:53 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात सुरूवात होत आहे. याआधी २०२१ चा हंगाम भारतात आयोजित केला गेला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि एकापाठोपाठ खेळाडूंना होत असलेले कोरोना संक्रमण लक्षात घेता बीसीसीआयने स्पर्धा २९ सामन्यांनंतर स्थगित केली होती. आता आयपीएल २०२१ चे हे उर्वरित ३१ सामने आता यूएईमध्ये खेळले जाणार आहेत.

उर्वरित सामने सुरू होण्याआधी राजस्थान राॅयल्स संघाने महत्वाची माहिती दिली आहे. यूएईत सुरू होणाऱ्या सामन्यांमध्ये संघात मोठा बदल झाला आहे. इंग्लंडचा जाॅस बटलर या हंगामात सहभागी होणार नाही. जाॅस बटलरच्या जागेवर राजस्थानच्या संघाने २४ वर्षीय ग्लेन फिलिप्स या खेळाडूला सामील केले आहे. राजस्थानच्या संघाने याची पुष्टी केली आहे.

यष्टीरक्षक फलंदाज जाॅस बटलर हा इंग्लंडचा तिसरा असा  खेळाडू आहे जो राजस्थान राॅयल्स संघासाठी आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नाही. जाॅस बटलरची पत्नी लुईस आई होणार आहे. ती या वर्षी तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. याच कारणामुळे जाॅस बटलरने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून मागार घेतली आहे.

बटलर ऐवजी राजस्थान संघात सामील झालेला न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्सने २५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने २२ डावांत ५०५ धावा केल्या आहेत. त्याने एका सामन्यामध्ये शतकही केले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ धावसंख्या १०८ आहे.

ग्लेन फिलिप्स आयपीएल २०२१ च्या लिलावात उपलब्ध होता. त्याची सर्वात कमी किंगत ५० लाख होती. मात्र, कोणत्याच संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. या लिलावत तो विकला गेला नाही. त्यानंतर आता तो याच हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. त्याला राजस्थान राॅयल्स संघाने बदली खेळाडूच्या रूपात संधी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

रक्षाबंधन विशेष: जगातील प्रसिद्ध भाऊ जे देशासाठी खेळले एकत्र क्रिकेट

रक्षाबंधन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या

‘द हंड्रेड लीग’ला मिळाला पहिला विजेता, स्टर्लिंगच्या झंझावती खेळीमुळे सदर्न ब्रेव्हची फायनलमध्ये बाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---