आयपीएलच्या मैदानात बुधवारी(६ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना पार पडला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत आरसीबीसमोर १४२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात आरसीबीने २० षटकात १३७ धावा केल्या आणि त्यांना चार धावांनी पराभव पत्करावा लागला.
हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने सामन्यात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अप्रतिम प्रदर्शन केले तसेच संघाचे उत्कृष्ट नेतृत्वही केले. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ निवडले गेले. त्याने आरसीबीविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर आनंद व्यक्त केला आहे.
सनरायझर्स हैदराबादचे या हंगामातील प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे. परंतु आरसीबीविरुद्धच्या सामन्यातील विजयामुळे कर्णधार केन विलियम्सन आनंदी दिसत आहे. तो म्हणाला की, “हा एक अवघड हंगाम राहिला आहे आणि आम्ही स्वत:मध्ये जे छोटे छोटे सुधार केले आहेत, ते पाहून खूप चांगले वाटले. त्या छोट्या समायोजनाला पाहून चांगले वाटले. आम्ही केवळ पावरप्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि चेंडू खेळपट्टीवर थांबून येत होता. आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी अवघड बनवण्यात यशस्वी ठरलो.”
सामन्यात विलियम्सनने आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलला डायरेक्ट हिट करून धावबाद केले होते. याबाबत तो म्हणाला की, “आम्हाला माहीत होते की, गोलंदाजांच्या दृष्टीने गोष्टी लवकर होणार नाहीत. पण आम्हाला माहीत होते की, जर आम्ही हिंमत ठेवली आणि तेथे जास्त काळासाठी कायम राहिलो, तर आम्ही त्यांच्यावर दबाव बनवू शकतो. सामना खूप संघर्षात्मक चालू होता आणि मॅक्सवेलला बाद करणे हाच आमच्याकडे सामन्यात परत येण्यासाठी एक मार्ग होता. तो एक अप्रतिम संघ आहे. आम्ही शर्यतीत नहीत, तरीही आमचे सर्वोत्कृष्ट देणे आणि सामन्याला रोमांचक बनवणे खूप चांगले होते.”
हैदराबादचा वेगवान गोलंदाजी उमरान मलिकने या सामन्यात त्याच्या अप्रतिम गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष्य आकर्षित केले होते. उमरानने या सामन्यात १५३ किलोमीटर दर ताशीच्या वेगाने एक चेंडू टाकला आणि तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू फेकणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. कर्णधार विलियम्सनने उमरानचेही कौतुक केले आहे.
उमरानविषयी बोलताना विलियम्सन म्हणाला की, “तो निश्चितच खास आहे. आम्ही त्याला मागच्या काही हंगामांमध्ये नेट्समध्ये पाहिले होते आणि तो प्रत्यक्षात एक स्पर्धक आहे. तो संथ खेळपट्टीवरही प्रभावी ठरत आहे. त्याच्यासोबत संघात खूप सहकारी आहेत आणि त्यामुळे ज्ञान शेअर करण्यासाठी मदत मिळते. युवकांसाठी यामध्ये सहभागी होणे एक अप्रतिम संधी आहे आणि आशा आहे की, आम्ही शिकत राहू आणि शुक्रवारी पुन्हा चांगल्या प्रदर्शनासोबत उतरू.”
महत्त्वाच्या बातम्या-
एकच मारला पण विक्रमी ठरला! भुवीच्या षटकात कडक षटकार खेचत डिविलियर्सचा ‘भीमपराक्रम’
कर्णधार विराटने सांगितले सनरायझर्सविरुद्धच्या पराभवाचे कारण; म्हणाला, “शेवटी डीविलियर्सने….”
अंतिम षटकात मॅच विनिंग गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरचा डिविलियर्सविरुद्ध होता ‘हा’ प्लॅन, वाचा