कोरोनाच्या दीर्घ विश्रांतीनंतर सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मोठी टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळली जात आहे. या स्पर्धेला 10 जानेवारी पासून सुरुवात झाली आहेत. या स्पर्धेत भारतातील दिग्गज आणि नवोदित खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत एक वेगळाच रोमांच बघायला मिळत आहे. या स्पर्धेत केरळ संघाच्या मोहम्मद अझरुद्दीनने मुंबई विरुद्ध दमदार खेळी करून सर्वाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.
मोहम्मद अझरुद्दीनने मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात सलामीला येत शानदार शतक ठोकले होते. त्यानंतर सर्व दिग्गज खेळाडूंचे ध्यान आपल्याकडे खेचले आहे. या डावात त्याने फक्त 37 चेंडूत शतक ठोकले होते. त्यांनंतर पुढे खेळताना त्याने 54 चेंडूत त्याने 137 धावांची नाबाद खेळी साकारली. ज्यामुळे केरळ संघाने मुंबईने दिलेल्या 197 धावांचे विशाल लक्ष अवघ्या 15.5 षटकात सहजरीत्या पार केले.
त्यामुळे आता 2021 मध्ये होणार्या आयपीएल लिलावात सर्व संघाचे लक्ष मोहम्मद अझरुद्दीनवर असणार आहे. यामध्ये तिळमात्र शंका नाही. त्यामुळे मोहम्मद अझरुद्दीनला याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मोहम्मद अझरुद्दीन सांगितले होते की, याबद्दल मला कोणतीही चिंता नाही. त्यामुळे सध्या तरी तो फक्त खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे.
पीटीआय सोबत बोलताना मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला, “मी सध्या तरी लिलावा बाबत कोणताही विचार करत नाही. मी आता फक्त माझे सर्व लक्ष खेळाचा आनंद घेण्यावर देत आहे. त्यामुळे आत माझे सर्व लक्ष आंध्र प्रदेश विरुद्ध होणार्या सामन्यावर आहे.” मोहम्मद अझरुद्दीन टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा तिसरा खेळाडू आहे. यावर त्याला विचारण्यात आले की, असे काय वेगळे घडले ज्यामुळे तू अशी खेळी साकारली.
या प्रश्नाचे उत्तर देताना मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला, “मी या खेळीसाठी कोणतेही विशेष तयारी केली नव्हती. खरतर जेव्हा डेव व्हाटमोर यांनी संघाची कमान आपल्या हाती घेतली होती, तेव्हा त्यांनी मला मधल्या फळीत फलंदाजी करण्यास सांगितले होते. संघाची गरज होती म्हणून मला मधली फळीत फलंदाजी करावी लागली. त्यामुळे माझ्या खेळीत प्रगती झाली. आता जेव्हा संघाची कमान टीनू योहान यांच्याकडे आहे, तर मी त्यांना विनंती केली मला सलामी फलंदाजी करायची आहे आणि त्याने मला संधी दिली. मुंबई विरुद्धच्या सामन्यात खेळपट्टी चांगली होती. मी आत्मविश्वासाने सरळ बॅटने शॉट खेळले आणि त्यामुळे हे घडले.”
महत्वाच्या बातम्या:
रोहितच्या बेजबाबदार फटक्यावर गावसकरांची टीका, म्हणाले एक वरिष्ठ खेळाडू असून
सोफी डिवाईनच्या मारलेला चेंडू लागला चिमुकलीच्या डोक्याला, मग तिने काय केलं ते पाहाच