---Advertisement---

प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी कोलकाता-पंजाब आमने सामने, पाहा उभयंतांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

On: शुक्रवार, ऑक्टोबर 1, 2021 5:38 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या ४५ व्या सामन्यात शुक्रवारी (१ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पंजाब किंग्जचा सामना करेल. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना खेळला जाईल. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी कोलकाता आणि पंजाब दोन्ही संघ मैदानात उतरतील.

कोलकाता सध्या ११ पैकी पाच सामने जिंकल्यानंतर १० गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पंजाबचा संघ ११ सामन्यांत चार विजय मिळवून आणि आठ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. कोणत्याही परिस्थितीत पंजाबला येथून सर्व सामने जिंकावे लागतील. त्याच वेळी, कोलकाताची परिस्थिती देखील अशीच आहे. ते हरले तर मुंबई आणि पंजाबची स्थिती मजबूत होईल.

आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर यात कोलकाताचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत एकूण २८ सामने झाले आहेत. यातील केकेआरने १९ सामने आणि पंजाबने ९ सामने जिंकले आहेत. यूएईमध्ये दोघांमध्ये तीन सामने झाले आहेत, ज्यामध्ये पंजाबने दोन आणि कोलकाताने फक्त एक सामना जिंकला आहे. कोलकाताने पंजाबविरुद्ध आयपीएल २०२१ पहिल्या टप्प्यातील सामना पाच गडी राखून जिंकला होता.

यावेळी दोन्ही संघांकडे एक नवीन खेळाडू आहे. केकेआरमध्ये व्यंकटेश अय्यर आणि पंजाबमध्ये रवी बिष्णोई आहे. या सामन्यात व्यंकटेशची आक्रमक फलंदाजी आणि बिश्नोईची फिरकी गोलंदाजी यांच्यात सामना पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोलकाता संघाबद्दल बोलायचे झाले तर अखेरच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला असला तरी संघाची फलंदाजी विशेष राहिली नव्हती. १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने सात गडी गमावले. शुभमन गिल (३०) आणि नितीश राणा (३६) वगळता एकही फलंदाज नीट फलंदाजी करू शकला नाही. अशा स्थितीत केकेआरच्या फलंदाजांना पंजाबच्या भक्कम गोलंदाजीसमोर खरे आव्हान पेलावे लागू शकते.

पंजाब संघासाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे ख्रिस गेलचे संघात नसणे. त्याने टी -२० विश्वचषकाच्या तयारीसाठी पंजाबचा बायो-बबल सोडला आहे. आता पंजाबकडे फक्त मोझेसे हेन्रिक्स, आदिल रशीद, ख्रिस जॉर्डन आणि फॅबियन ऍलन हे परदेशी खेळाडू राहिले आहेत. यापैकी कुणाला कर्णधार केएल राहुल संधी देतो हे पाहणे मनोरंजक असेल.

असे असू शकतात संभावित ११ जणांचे संघ

कोलकाता नाईट रायडर्स: शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन(कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, टीम साउथी, लॉकी फर्ग्युसन, संदीप वॉरियर/प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्ज: केएल राहुल, मनदीप सिंग/मयंक अगरवाल, एडेन मार्करम, निकोलस पूरन, मोझेसे हेन्रिक्स/फॅबियन ऍलन, दीपक हुडा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘अजून १०-१५ धावा असत्या तर चेन्नईला हरवू शकलो असतो’, पराभवानंतर विलियम्सनची प्रतिक्रिया

‘सांगलीकर’ स्म्रीती मंधनाने गाजवले ऑस्ट्रेलियाचे मैदान, विराटनंतर ‘अशी’ कामगिरी करणारी दुसरीच भारतीय

“धोनीने ज्याप्रकारे विजयी षटकार मारला, त्यामुळे विरोधी संघांनी आता घाबरले पाहिजे”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---